TRENDING:

T20 world Cup : वर्ल्ड कप विजयानंतर संस्कार विसरला नाही, घरात पाय ठेवताच टीम इंडियाच्या मॅचविनरचा मोठा निर्णय

Last Updated:

विजयानंतर टीम इंडियाचा एक खेळाडू संस्कार विसरला नव्हता.कारण घरात पाय ठेवताच त्याने एक मोठा निर्णय घेतला होता. त्यामुळे हा खेळाडू नेमका कोण आहे? हे जाणून घेऊयात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
T20 world cup : टी20 वर्ल्ड कपची फायनल जिंकून टीम इंडियाने इतिहास रचला होता. टीम इंडियाच्या या विजयानंतर खेळाडूंनी मैदानात तुफान जल्लोष केला होता. या जल्लेषानंतर सर्व खेळाडू मायदेशात परतले होते. दरम्यान या विजयानंतर टीम इंडियाचा एक खेळाडू संस्कार विसरला नव्हता.कारण घरात पाय ठेवताच त्याने एक मोठा निर्णय घेतला होता. त्यामुळे हा खेळाडू नेमका कोण आहे? हे जाणून घेऊयात.
T20 world Cup
T20 world Cup
advertisement

खरं तर हा खेळाडू तोच आहे ज्याने फायनल सामन्यात 8 बॉलमध्ये 26 धावांची वादळी खेळी केली होती.त्याच्या याच वादळी खेळीच्या बळावर भारताने फायनलमध्ये न्यूझीलंडसमोर 255 धावांचा डोंगर उभारला होता. तुम्हाला अजूनही जर हा खेळाडू कोण आहे? हे समजू शकले नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो,हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून टीम इंडियाचा मॅच विनर शिवम दुबे आहे.

advertisement

खरं तर वर्ल्डकपच्या समाप्तीनंतर त्याच रात्री शिवम दुबे लोकलने मुंबईत दाखल झाला होता.त्याचं झालं असं की रविवारी रात्री सामना जिंकल्यानंतर अहमदाबादमधून मुंबईत येण्यासाठी फ्लाईटस उपलब्ध नव्हत्या.त्यामुळे त्याने ट्रेनचा पर्याय निवडला होता. तो त्याची पत्नी आणि एका मित्रासोबत ट्रेनने प्रवास करत मुंबईमध्ये परतला होता. त्याला त्याच्या मुलांना भेटायचं असल्याने त्याने हा निर्णय घेतला होता.

advertisement

कोणत्याही फ्लाईट उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे मी अहमदाबादमधून पहाटेच्या ट्रेनने मुंबईला येण्याचा निर्णय घेतला. आम्ही रस्त्याने गाडीने जाऊ शकलो असतो. पण ट्रेनने कमी वेळ लागणार होता. मी, माझी पत्नी आणि एका मित्राने ट्रेनने जाण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार आम्ही 3 बर्थ एसीच्या तिकीटाने प्रवास करून मुंबईत दाखल झालो होतो, असे शिवम दुबेने इंडियन एक्सप्रेसला सांगितले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कडाक्याच्या उन्हात वाघोबाचा थाट, सिद्धार्थ उद्यानात बसविण्यात आली खास कूलिंग व्यवस्था, Video
सर्व पहा

दरम्यान घरात पाय ठेवल्यानंतर शिवम दुबेने एक मोठा निर्णय घेतला होता. शिवम दुबेने घरात पाय ठेवताच आपल्या वडिलांच्या गळ्यात वर्ल्ड कप विजयाचं मेडल घातलं होतं. या सदंर्भातले फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोच्या कॅप्शनला त्याने माझ्या आयुष्याचा खरा हिरो असे लिहले होते.शिवम दुबेचा हिच गोष्ट चाहत्यांना प्रचंड आवडली आहे.त्यामुळेच तो वर्ल्ड कप विजयानंतर संस्कार विसरला नसल्याचे बोलले जात आहे.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 world Cup : वर्ल्ड कप विजयानंतर संस्कार विसरला नाही, घरात पाय ठेवताच टीम इंडियाच्या मॅचविनरचा मोठा निर्णय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल