शोएब अख्तरला बाबरने चोपलं
एक्झिबिशन ही मॅच पाकिस्तानमधील पूरग्रस्तांना मदत निधी गोळा करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. या मॅचमधील सर्वात आठवणीतला क्षण तो होता, जेव्हा लिजेंडरी गोलंदाज शोएब अख्तरला बाबरने सलग दोन फोर मारले. शोएब अख्तर सराव नसल्याने थकल्याचं दिसून आलं होतं. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये, बाबरने शोएबला एक मोठा सिक्स आणि त्यानंतर दोन फोर मारताना पाहिले गेले.
advertisement
सईद अजमल उडवल्या बाबरच्या दांड्या
बाबरने केवळ 20 बॉलमध्ये 35 रन बनवले. त्यानंतर स्पिनर सईद अजमल बॉलिंगसाठी आला. बाबरने अजमलच्या बॉलवर एक सिक्स मारून 22 बॉलमध्ये 41 रन बनवले. पण पुढच्याच बॉलवर अजमलने त्याची स्टंप उडवून त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. बाबर पुन्हा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत होता. पण इथंही बाबर बोल्ड झाल्याने त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसत आहे.
आशिया कपमध्ये तोटा होणार?
दरम्यान, बॅटिंगसोबतच बाबरने बॉलिंगमध्येही योगदान दिलं. बॉलिंगमध्ये बाबरने असे कौशल्य दाखवलं जे आजपर्यंत जगाला माहिती नव्हतं. त्याला भलंही एकदिवसीय किंवा टी-20 मध्ये बॉलिंग करण्याची संधी मिळाली नसेल, पण इतर फॉरमॅटमध्ये त्याची बॉलिंग चांगली आहे, हे दिसून आलं. त्यामुळे आता पाकिस्तानला याचा आशिया कपमध्ये तोटा होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.