TRENDING:

VIDEO : मानलं पठ्ठ्याला! वर्ल्ड कप बाहेर राहून सगळी महफिल लुटली, टीम इंडियाच्या कॅप्टनची तुफान चर्चा

Last Updated:

वर्ल्डकप बाहेर असलेल्या टीम इंडियाच्या एका खेळाडूने सगळी महफील लुटली आहे.या संदर्भातला त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Shubman Gill Gift Pujab Team Sneakers : टीम इंडिया टी20 वर्ल्ड कपच्या सूपर 8 मध्ये पोहोचली आहे. सूपर 8 मध्ये टीम इंडियाचा पहिला सामना हा साऊत आफ्रिकेशी होणार आहे. हा सामना रविवारी 22 फेब्रुवारी 2026 ला खेळवला जाणार आहे. या सामन्याची चर्चा असताना वर्ल्डकप बाहेर असलेल्या टीम इंडियाच्या एका खेळाडूने सगळी महफील लुटली आहे.या संदर्भातला त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
shubman gill
shubman gill
advertisement

हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून टीम इंडियाने वनडे आणि टेस्टचा कॅप्टन शुभमन गिल आहे. शुभमन गिल टीम इंडियाच्या वर्ल्ड कप संघाचा भाग नाही आहे. खरं तर त्याच्या वर्ल्डकप समावेशासाठी प्रचंड प्रयत्न सूरू होते. पण तो सातत्याने टी20 क्रिकेटमध्ये अपयशी ठरत असल्याने त्याला संघाबाहेर करण्यात आले होते.त्याच्या जागी मग नंतर संजू सॅमसन संघात जागा देण्यात आली होती.

advertisement

दरम्यान वर्ल्डकप संघात निवड न झाल्याने शुभमन गिल शांत राहिला नाही तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये व्यस्त होता. त्यानंतर तो अनेक फॅमिली फक्शनमध्य देखील दिसला होता. आता तो आयपीएल 2026 च्या तयारीला लागल्याची देखील माहिती आहे. असे असतानाच शुभमन गिलचा एक व्हिडिओ व्हायरल होत.

advertisement

पंजाबच्या टीमने हा व्हिडिओ शेअर केला आहे.या व्हिडिओमध्ये पंजाबचे कोच म्हणतात, शुभमन गिल तुम्हा सगळ्यांना एक छोटीसी भेट देण्याचा इच्छा व्यक्त केली होती.त्यानुसार तो आपले गिफ्ट घेऊन आला. त्याबाबत आपण त्याचे आभार मानू या. त्यानंतर शुभमन गिल आपल्या हाताने पंजाबच्या प्रत्येक खेळाडूला आपल्या सहिचे स्निकर भेट स्वरूपात देतो. प्रशिक्षकांना देखील तो हे स्निकर देतो.

advertisement

पंजाब क्रिकेट असोसिएशनने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये शुभमन गिल पंजाब क्रिकेट संघातील खेळाडू आणि प्रशिक्षक कर्मचाऱ्यांसाठी खास भेटवस्तू घेऊन येत असल्याचे दिसून आले.

भारतीय कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याच्या कामगिरीबद्दल सर्वांसाठी नाइके एअर फोर्स 1 आणला. शुभमन गिलने उद्गार काढले की हे स्नीकर्स विशेषतः भारतासाठी बनवले आहेत. व्हिडिओ शूट केला तेव्हा, बाजारात हे स्नीकर्स रिलीज झाले नव्हते आणि पंजाब संघातील खेळाडू आणि प्रशिक्षक कर्मचाऱ्यांकडेच ते होते.

पंजाब क्रिकेट खेळाडूंना शुभमन गिलकडून त्यांचे स्नीकर्स स्वाक्षरी करून घेताना दिसले. प्रशिक्षकांनी भेटवस्तूसाठी भारतीय कर्णधाराचे आभार मानले आणि त्यांच्यासाठी त्यांच्या शूजवर स्वाक्षरी केली.

आयपीएलच्या प्रॅक्टीसला सुरुवात 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Tata आता करणार मार्केट जाम, आणली 468 किमी मायलेजदार SUV; किंमतही 6 लाखांपासून
सर्व पहा

शुभमन गिलने आयपीएल २०२६ साठी प्रशिक्षण सुरू केले आहे.तो राजस्थानमधील नाथद्वारा येथील मदन पालीवाल मिराज स्पोर्ट्स सेंटरमध्ये गुजरात टायटन्सच्या प्री-कॅम्पमध्ये सामील झाला आहे.शिबिरापूर्वीच्या सरावात, शुभमन गिलने नेटमध्ये कठोर प्रशिक्षण घेतले आणि त्याच्या शस्त्रागारात अनेक शॉट्स आणले. प्रशिक्षणादरम्यान त्याने काही मोठे शॉट्स काढले, प्री-कॅम्पचे नेतृत्व मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा करत होते.आयपीएल २०२६ चा हंगाम मार्च ते मे दरम्यान होण्याची अपेक्षा आहे आणि बीसीसीआय आणि आयपीएलने अद्याप त्याचे वेळापत्रक अधिकृत केलेले नाही

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : मानलं पठ्ठ्याला! वर्ल्ड कप बाहेर राहून सगळी महफिल लुटली, टीम इंडियाच्या कॅप्टनची तुफान चर्चा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल