TRENDING:

Smriti Mandhana : याला म्हणतात लीडर! अंगात 103 डिग्री ताप तरीही मैदानात उतरली स्मृती मानधना, RCB ला जिंकून दिली ट्रॉफी

Last Updated:

Smriti Mandhana ill before WPL final : फायनलच्या एक दिवस आधी स्मृतीला 103 डिग्री इतका प्रचंड ताप होता आणि तिची प्रकृती अत्यंत खालावली होती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Smriti Mandhana Fever before WPL final : आरसीबीने वुमेन्स प्रिमियर लीगमधील दुसरं टायटल आपल्या नावावर केलं आहे. कॅप्टन स्मृती मानधनाच्या नेतृत्वात आरसीबीने ट्रॉफी जिंकली. फायनलच्या दिवशी म्हणजेच 5 फेब्रुवारीला स्मृतीने आपल्या बॅटिंगने दिल्लीच्या बॉलर्सना अक्षरशः हतबल केलं. तिने केवळ 41 बॉलमध्ये तुफानी 87 रन्सची इनिंग खेळली. या खेळीमुळे आरसीबीला दिल्लीने दिलेले मोठे टार्गेट सहजपणे गाठता आले आणि टीमने दुसऱ्यांदा ट्रॉफीवर आपले नाव कोरलं पण तुम्हाला माहितीये का? स्मृती फायनलआधी अंथरूणातून उठूही शकत नव्हती.
Smriti Mandhana ill 103 degree Fever 24 hours before WPL final
Smriti Mandhana ill 103 degree Fever 24 hours before WPL final
advertisement

103 डिग्री इतका प्रचंड ताप

विमेन्स प्रीमियर लीगच्या फायनल मॅचमध्ये आरसीबीची कॅप्टन स्मृती मंधाना हिने दाखवलेले शौर्य आता क्रिकेट चाहत्यांसाठी चर्चेचा विषय ठरलं आहे. 4 फेब्रुवारी रोजी स्मृतीला 103 डिग्री इतका प्रचंड ताप होता आणि तिची प्रकृती अत्यंत खालावली होती. मात्र, आपल्या टीमला विजेतेपद मिळवून देण्यासाठी तिने या आजारावर मात करत मैदानात उतरण्याचा धाडसी निर्णय घेतला. 103 डिग्री ताप असताना देखील तिने रणनिती आखली अन् आरसीबीला जिंकवलं. तापापामुळे तिला फिल्डिंग करताना नीट वाकताही येत नव्हतं, आणि तिला खूप अशक्तपणा जाणवत होता, त्यामुळे बक्षीस वितरण समारंभापूर्वी ती बहुतेक वेळ डगआउटमध्येच बसली होती.

advertisement

टीमला चॅम्पियन बनवलं

स्मृतीच्या या जिद्दीने क्रिकेट विश्वात तिचं कौतुक होत आहे. तापात असतानाही तिने ज्या प्रकारे मैदानात धावपळ केली आणि आक्रमक शॉट्स मारले, ते पाहून सर्वच थक्क झाले आहेत. तिच्या या शानदार खेळीसाठी तिला 'प्लेअर ऑफ द मॅच' (POTM) या पुरस्काराने गौरवण्यात आले. आरसीबीच्या या विजयात स्मृतीचा वाटा सिंहाचा राहिला आहे. तिने केवळ स्वतः रन्स केले नाहीत, तर जॉर्जिया वोलसोबत 165 रन्सची महत्त्वाची पार्टनरशिप करत विजयाचा मार्ग सोपा केला. एका बाजूला शारीरिक त्रास असताना दुसरीकडे मानसिक कणखरता दाखवत तिने टीमला चॅम्पियन बनवलंय.

advertisement

डब्ल्यूपीएलच्या इतिहासात आयकॉनिक खेळी 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुणे-मुंबईचा नाद सोडला अन् गाव गाठलं, अर्ध्या एकरात केली शेती, 3 महिन्यात लखपती
सर्व पहा

दरम्यान, स्मृती मंधानाची ही खेळी आता डब्ल्यूपीएलच्या इतिहासात आयकॉनिक मानली जात आहे. आरसीबी फॅन्ससाठी हे विजेतेपद खूपच खास आहे, कारण कॅप्टनने स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता मैदानात दिलेले हे योगदान अविस्मरणीय ठरले आहे. स्मृतीने सिद्ध केलं की जिद्द असेल तर कोणत्याही संकटावर मात करता येते.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Smriti Mandhana : याला म्हणतात लीडर! अंगात 103 डिग्री ताप तरीही मैदानात उतरली स्मृती मानधना, RCB ला जिंकून दिली ट्रॉफी
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल