TRENDING:

SRH vs RCB : हैदराबादने बंगळुरूचा गेम बिघडवला! पाटीदारची टीम टॉप 2 मधून बाहेर पडणार?

Last Updated:

हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 231 धावा ठोकल्या आहेत. या धावांचा पाठलाग करताना रॉयल चँलेजर्स बंगळुरु 189 धावांवर ऑल आऊट झाली आहे. त्यामुळे हैदराबादने हा सामना 41 धावांनी जिंकला आहे.या विजयासह हैदराबादने बंगळुरूचा मोठा गेम केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
SRH vs RCB : आयपीएलमध्ये आज प्लेऑफमधून बाहेर पडलेल्या सनरायझर्स हैदराबादने पॉईटस टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी असलेल्या रॉयल चँलेजर्स बंगळुरूचा पराभव केला आहे. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 231 धावा ठोकल्या आहेत. या धावांचा पाठलाग करताना रॉयल चँलेजर्स बंगळुरु 189 धावांवर ऑल आऊट झाली आहे. त्यामुळे हैदराबादने हा सामना 41 धावांनी जिंकला आहे.या विजयासह हैदराबादने बंगळुरूचा मोठा गेम केला आहे.
RCB vs SRH
RCB vs SRH
advertisement

खरं तर पॉईट्स टेबलमध्ये आजच्या सामन्याआधी बंगळुरुचे 12 सामन्यात 17 गुण होते. आता आरसीबीचे दोन सामने उरले होते. हैदराबाद विरूद्धचा आजचा सामना आणि आणखीण एक सामना असे दोन सामने. हे दोन सामने जिंकून बंगळूरूला 21गुणांसह टेबल टॉप करण्याची संधी होती. मात्र हैदराबादने या सर्वावर पाणी फेरले आहे. हैदराबादच्या विजयाने आता बंगळूरूचे 13 सामन्यात 17 गुण झाले आहेत.त्यामुळे शेवटचा सामना जिंकून बंगळूरू 19 गुणापर्यंत पोहोचू शकते.त्यामुळे आता बंगळूरु तिसऱ्या स्थानी राहण्याची शक्यता आहे.

advertisement

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट, विराट कोहली, मयंक अग्रवाल, जितेश शर्मा (w/c), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, लुंगी एनगिडी, सुयश शर्मा

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन (w), नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (क), हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, एशान मलिंगा

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
SRH vs RCB : हैदराबादने बंगळुरूचा गेम बिघडवला! पाटीदारची टीम टॉप 2 मधून बाहेर पडणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल