रजनीश यादव असे या तरुणाचे नाव आहे. तो बिहारच्या खगडिया जिल्ह्यातील झखरा या गावातील रहिवासी आहे. ड्रीम11 ने त्याचे नशिबच पालटून टाकले आहे. स्टील वर्कचे काम मिस्तरी रजनीश हा मागील 2 वर्षांपासून ड्रीम11 वर टीम बनवायचा.
advertisement
काही वेळा तो हरला तर काही वेळा जिंकला. मात्र, एका रात्री त्याने जी क्रिकेट टीम बनवली त्या क्रिकेट टीमच्या बळावर त्याने एक कोटी रुपये जिंकले आहेत.
रजनीश कुमार बहादुर यादव या तरुणाने लोकल18 शी बोलताना सांगितले की, बारावीच्या शिक्षणानंतर मागील 4 वर्षांपासून तो स्टील वेल्डिंगचे काम करत आहेत. तसेच यातच मागील काही महिन्यांपासून त्याला ड्रीम11 खेळण्याचे वेड लागले होते.
यामध्ये आतापर्यंत तो 40 हजार रुपये जिंकला आहे. मात्र, शनिवारी रात्री 1 वाजून 12 मिनिटांनी त्याचे नशिब उजळले, जेव्हा त्याने मोबाईलवर 1 कोटी रुपये जिंकल्याचे नॉटिफिकेशन पाहिले.
त्याने सांगितले की, करोडपती बनल्यानंतर त्यांच्या कुटुंबासह संपूर्ण गाव आनंदी आहे. रजनीश यादवचे वडील लाल बहादूर यादव यांनी सांगितले की, आमचा मुलगा करोडपती झाला आहे, हे आम्हाला विश्वास बसत नाही आहे. बँकेतून पैसे काढल्यानंतर सर्वात आधी मी 5 लाख रुपयांचे कर्ज फेडेल, असे त्यांनी सांगितले.
तर त्याच्या आई जयमाला देवी यांनी सांगितले की, आमचा मुलगा करोडपती झाला आहे, हे आम्हाला विश्वास बसत नाही आहे. मी तुझे स्वप्न पूर्ण करून घराचे राहिलेले काम पूर्ण करेन, असे माझा मुलगा म्हणतो, असेही त्यांनी सांगितले.