बॅटिंग लाईनअपचे कंबरडे मोडले
सलामीवीर उस्मान ख्वाजा याने सर्वाधिक 29 रन्सचे योगदान दिले, तर ट्रेव्हिस हेड 12 रन्स करून बाद झाला. कॅप्टन स्टीव्ह स्मिथला केवळ 9 रन्स करता आले. इंग्लंडच्या जोश टंग याने घातक बॉलिंग करत 3 विकेट्स घेतल्या, तर गस ॲटकिन्सनने 2 आणि बेन स्टोक्सने 1 विकेट मिळवून ऑस्ट्रेलियाच्या बॅटिंग लाईनअपचे कंबरडे मोडले. यावेळी स्मिथला जोश टंग याचा बॉल कळालाच नाही. जोश टंग याने ओव्हरमध्ये सगळे आऊट स्विंग बॉल टाकले अन् एकच बॉल इनस्विंग केला. त्यावर स्मिथची विकेट मिळाली.
advertisement
पाहा Video
सध्या मैदानावर कॅमेरून ग्रीन 7 बॉल्स खेळून शून्य रन्सवर खेळत असून, त्याला साथ देण्यासाठी मायकेल नेसर 4 बॉल्स खेळून शून्य रन्सवर उभा आहे. इंग्लंडच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ तंबूत परतल्याने आता खालच्या फळीतील फलंदाजांवर धावसंख्या सन्मानजनक स्थितीत पोहोचवण्याची मोठी जबाबदारी आहे. या मॅचचा रन रेट सध्या 2.84 इतका कमी असून ऑस्ट्रेलियन टीम मोठ्या संकटात सापडली आहे.
दरम्यान, पहिले तीन कसोटी सामने जिंकून ऑस्ट्रेलियाने अॅशेस मालिका खिशात घातली आहे. अशातच आता इंग्लंडला मालिकेत लाज राखण्यासाठी दोन सामने जिंकावे लागणार आहेत.
