TRENDING:

Suryakumar Yadav : वानखेडेवर नोरा फतेहीचे ठुमके, सूर्या एकटक बघत बसला! पत्नी देविशाने पाहताच अशी झाली फजिती, पाहा Video

Last Updated:

Suryakumar Yadav wife caught watching Nora Fatehi : टीम इंडियाचा कॅप्टन पत्नीच्या जाळ्यात सापडल्याचा एक भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
T20 World Cup 2026 Opening ceremony : आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपला आता धमाकेदार अंदाजात सुरूवात झाली आहे. मुंबईच्या वानेखेडे स्टेडियमवर ओपनिंग सेरेमनी पार पडली. यावेळी अनेक कलाकारांनी आपली कला सादर केली. यावेळी अभिनेत्री नोरा फतेही हिचा डान्सचा कार्यक्रम पार पडला. नोराला पाहण्यासाठी स्टेडियमवरील प्रेक्षकच काय तर टीम इंडियाचे खेळाडू देखील ड्रेसिंग रुममधून बाहेर आले. त्यानंतर जे काही घडलं, त्याचा मजेशीर व्हिडीओ समोर आलाय.
Suryakumar Yadav wife caught watching Nora Fatehi
Suryakumar Yadav wife caught watching Nora Fatehi
advertisement

सूर्या रंगेहात पकडला गेला

टीम इंडियाचा पहिला सामना युएसए विरुद्ध पार पडला. वाखनेडेवर झालेल्या या सामन्यात कॅप्टन सूर्यकुमार यादवने अफलातून कामगिरी करत विजय मिळवून दिला होता. मात्र, मॅचपूर्वी सूर्या रंगेहात पकडला गेल्याचं पहायला मिळालं. सूर्यकुमारची ओपनिंग सेरेमनीला भलतीच फजिती झाली. नोराचा डान्स सुरू झाला अन् टीम इंडियाचे खेळाडू ड्रेसिंग रुमधली प्लॅनिंग सोडून बाहेर आले. खेळाडू तर सोडा गौतम गंभीर देखील ड्रेसिंग रुमच्या गॅलरीत टाचावर करून बघत होता. त्याच वेळी सूर्या सापडला.

advertisement

पाहा Video

जेव्हा देविशाकडं पाहिलं तेव्हा...

नोराचा डान्स सुरू असताना सूर्या एकटक डान्स पाहत होता. त्याचवेळी स्टेडियममध्ये बसलेल्या सूर्याच्या पत्नीने म्हणजेच देविशाने सूर्याला पाहिलं. त्यावेळी सूर्या नोराकडे पाहत बसला होता. सूर्यासह इतर खेळाडूंनी जेव्हा देविशाकडं पाहिलं तेव्हा त्यांना हसू आवरलं नाही. देविशाने सूर्याला नोराकडे पाहताना रेडहँड पकडलं. त्यानंतर शेजारी उभ्या असलेल्या ईशान किशन आणि अर्शदीप सिंग यांना हसू आवरलं नाही.

advertisement

एकट्यानं झुंज दिली अन् सामना जिंकवला

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Valentines Day ला खिशाला कात्री, गुलाबाला सोन्याचं मोल, किती मोजावे लागणार? Vide
सर्व पहा

दरम्यान, काही वेळानंतर सूर्यकुमार यादव ड्रेसिंग रुममध्ये गेला. त्यानंतर सूर्यकुमार आणि इतर खेळाडू पुन्हा टीम इंडियाच्या जर्सीत खाली उतरल्याचं दिसून आलं. सूर्यकुमारने मोठी झुंज देऊन युएसएविरुद्धचा सामना जिंकवला होता. प्रेशरची परिस्थिती असताना सूर्यकुमार यादवने एकट्यानं झुंज दिली अन् सामना जिंकूनच मोकळा श्वास घेतला.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Suryakumar Yadav : वानखेडेवर नोरा फतेहीचे ठुमके, सूर्या एकटक बघत बसला! पत्नी देविशाने पाहताच अशी झाली फजिती, पाहा Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल