TRENDING:

IPL ऑक्शनमध्ये उतरला, पण कुणीच भाव दिला नाही, शेवटी डबल सेंच्युरी ठोकून सगळा राग काढला

Last Updated:

आयपीएल 2026 चा मिनी ऑक्शन नुकताच पार पडला. या लिलावात अनेक तरूण खेळाडूंना बोलीच लागली नाही. त्यानंतर देखील काही खेळाडू निराश झाले नाही. याउलट त्यांनी आपली कामगिरी उंचावून वादळी खेळी केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
swastik samal hits double hundred
swastik samal hits double hundred
advertisement

Vijay Hazare Trophy : आयपीएल 2026 चा मिनी ऑक्शन नुकताच पार पडला. या लिलावात अनेक तरूण खेळाडूंना बोलीच लागली नाही. त्यानंतर देखील काही खेळाडू निराश झाले नाही. याउलट त्यांनी आपली कामगिरी उंचावून वादळी खेळी केली आहे.या सामन्यात एक स्टार खेळाडू अनसोल्ड राहिला.त्याला कोणत्याच संघाने ताफ्यात घेतलं नाही. पण त्याने डबल सेंच्यूरी ठोकून सगळ्या फ्रेंचायजींना चुकीच ठरवलं आहे.

advertisement

हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून स्वास्तिक समल आहे. स्वास्तिक समल आज ओडीसा संघाकडून सौराष्ट्र विरूद्ध विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत सामना खेळत होता. या सामन्यात त्याने 212 धावांची खेळी केली आहे. या खेळी दरम्यान त्याने 8 षटकार आणि 21 चौकार लगावले आहेत. त्याची ही खेळी पाहून आयपीएल फ्रेंचायजींना पश्चाताप होत असेल. कारण स्वास्तिक समल आयपीएल ऑक्शनमध्ये सहभागी झाला होता, पण कुणीच त्याला संघात घेतलं होतं.

advertisement

डबल सेच्यूरी करून संघ सामना हरला

25 वर्षीय स्वास्तिक समालने ओडिशासाठी डावाची सुरुवात केली आणि संघाला चांगली सुरुवात करून दिली, परंतु त्यानंतर ओडिशाने ओम, संदीप पटनायक आणि गोविंद पोद्दार यांना गमावले, ज्यामुळे संघ 11.5 ओव्हरमध्ये 3 विकेट 59 धावांवर आदळला. त्यानंतर सामलला कर्णधार बिप्लब सामंत्रेसह डाव पुढे

advertisement

न्यावा लागला, ज्यामुळे त्याला शेवटपर्यंत क्रीजवर राहावे लागले. त्यांनी मिळून 211 बॉलमध्ये 261 धावांची मोठी भागीदारी केली. सामंत्रेने त्याचे शतक पूर्ण केले, तर सामलने 212 धावांवर बाद झाला. या बळावर ओडीशाने 6 विकेट गमावून 345 धावा केल्या.

advertisement

स्वस्तिक सामलने ओडिशाकडून सौराष्ट्रविरुद्ध अलूर येथे 169 बॉलमध्ये 212 धावा करून इतिहास रचला. सामल लिस्टक्रिकेटमध्ये द्विशतक करणारा ओडिशाचा पहिला फलंदाज ठरला. ही खेळी विजय हजारे ट्रॉफीच्या इतिहासातील पाचव्या क्रमांकाची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या होती. त्याने 2019 मध्ये झारखंडविरुद्ध मुंबईकडून यशस्वी जयस्वालच्या 203 धावांना मागे टाकले.

345 धावांच्या या लक्ष्याचा पाठलाग करताना सम्मक गज्जरने 132 धावांची शतकीय खेळी केली. तर चिराग जानीने 86 धावा आणि विश्वराज जडेजाने 50 धावा या बळावर 48.5 ओव्हरमध्ये सौराष्ट्रने लक्ष्य गाठत 5 विकेटने सामना जिकला.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
चिकन, मटणपेक्षा महाग झाली ही भाजी, प्रोटीनच्या बाबतीत मासेही काहीच नाही!
सर्व पहा

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL ऑक्शनमध्ये उतरला, पण कुणीच भाव दिला नाही, शेवटी डबल सेंच्युरी ठोकून सगळा राग काढला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल