टीम इंडियाकडुन प्रथम फलंदाजी करताना अभिषेक शर्मा आणि ईशान किशननने चांगली सूरूवात केली होती. दोघांनी सूरूवातीच्या दोन ओव्हरमध्ये संथ खेळी केली होती.यामुळे भारताला फक्त दोन ओव्हरमध्ये 12 च धावा करता आल्या होत्या. पण त्यानंतर टीम इंडियाच्या दोन्ही ओपनरने नंतर गिअर बदलल पुढच्याच चार ओव्हरमध्ये
80 धावा ठोकल्या होत्या.
अशाप्रकाके भारताने पॉवरप्लेमध्ये 92 धावा केल्या होत्या. या आतापर्यंत वर्ल्ड कप फायनलमधल्या सर्वाधिक धावा होत्या. खरं या धावाच न्यूझीलंडला प्रचंड महागात पडल्या होत्या. या धावा का महागात पडतील आणि न्यूझीलंडच्या कॅप्टनने नेमकी काय चूक केली आहे? हे जाणून घेऊयात.
advertisement
खरं तर पॉवरप्लेमध्ये भारताला फक्त दोन ओव्हरमध्ये 12 च धावा करता आल्या होत्या.त्यामुळे खेळ न्यूझीलंडच्या नियंत्रणात होता. आणि इथून पुढेही नियंत्रणातच असता पण कॅप्टन सँटनरने ग्लेन फिलिप्स वगळता एकाही स्पिनरला गोलंदाजी दिली नाही आणि तो स्वत:ही गोलंदाजीला आला नाही.आणि उरलेल्या पॉवरप्लेमधील पाच ओव्हर या फास्टर बॉलरने टाकल्या.त्यामुळे टीम इंडियाला धावा काढायला चांगली मदत मिळाली. खरं तर न्यूझीलंडच्या कॅप्टनची ही चूक कुणालाच कळली नाही, मग भले तो कितीही मोठा एक्स्पर्ट असो.
आता मिचेल सँटनरची ही चुक त्याला किती महागात पडते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
