advertisement

APMC Market: केळीची आवक घटली, लिंबूनं खाल्ला भाव, कांदा अन् द्राक्षांना कुठं मिळाला सर्वाधिक दर?

Last Updated:

APMC Market: महाराष्ट्रातील कृषी मार्केटमध्ये केळी, द्राक्षे, कांदा आणि लिंबू यांची आवक आणि दर यांबाबत अपडेट जाणून घेऊ.

+
APMC

APMC Market: केळीची आवक घटली, लिंबूनं खाल्ला भाव, कांदा अन् द्राक्षांना कुठं मिळाला सर्वाधिक दर?

मुंबई: महाराष्ट्रातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या उलाढाली होत आहेत. रविवारी देखील कृषी मालाची मोठी आवक राहिली आणि दरांत चढउतार राहिले. जागतिक घडामोडी, मागणी आणि आवकेतील तफावत यांमुळे केळी, द्राक्षे, लिंबू आणि इतर शेतमालाच्या दरांत चढउतार होत आहेत. 8 मार्च रोजीचं कृषी मार्केटमधील अपडेट जाणून घेऊ.
कांद्याला भाव किती?
राज्याच्या मार्केटमध्ये 51 हजार 793 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 22 हजार 952 क्विंटल सर्वाधिक आवक पुणे बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 625 ते 1300 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच अहिल्यानगर मार्केटमध्ये आवक झालेल्या 1993 क्विंटल कांद्यास सर्वसाधारण 1001 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
मार्केटमध्ये 632 क्विंटल लिंबूची आवक
राज्याच्या मार्केटमध्ये आज 632 क्विंटल लिंबूची आवक राहिली. यापैकी पुणे बाजारात आवक झालेल्या 623 क्विंटल लिंबास 5700 ते 7150 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच अहिल्यानगर मार्केटमध्ये आवक झालेल्या 6 क्विंटल लिंबास 8500 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.
पुणे बाजारात सर्वाधिक द्राक्षांची आवक
राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 823 क्विंटल द्राक्षाची आवक झाली. यापैकी पुणे बाजारात 821 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 5500 ते 11500 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजार भाव मिळाला.
advertisement
केळीची आवक घटली
राज्याच्या मार्केटमध्ये आज केवळ 178 क्विंटल केळीची आवक झाली. पुणे बाजारात आवक झालेल्या केळीला प्रतीनुसार 1250 ते 4000 रुपये दरम्यान बाजार भाव मिळाला.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
APMC Market: केळीची आवक घटली, लिंबूनं खाल्ला भाव, कांदा अन् द्राक्षांना कुठं मिळाला सर्वाधिक दर?
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement