advertisement

T20 World Cup : फायनलमध्ये अभिषेक-संजूने इतिहास घडवला, पाकिस्तानचा वर्ल्ड रेकॉर्ड भुईसपाट!

Last Updated:

टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पहिले बॅटिंग करणाऱ्या टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 255 रन केल्या. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन या ओपनरनी फायनलमध्ये धमाका केला.

फायनलमध्ये अभिषेक-संजूने इतिहास घडवला, पाकिस्तानचा वर्ल्ड रेकॉर्ड भुईसपाट!
फायनलमध्ये अभिषेक-संजूने इतिहास घडवला, पाकिस्तानचा वर्ल्ड रेकॉर्ड भुईसपाट!
अहमदाबाद : टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पहिले बॅटिंग करणाऱ्या टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 255 रन केल्या. वेस्ट इंडिज आणि इंग्लंडविरुद्ध अर्धशतकं झळकावलेल्या संजू सॅमसनने फायनलमध्येही अर्धशतकी खेळी केली. संजूने 46 बॉलमध्ये 193.48 च्या स्ट्राईक रेटने 89 रन केले. संजूने त्याच्या या खेळीमध्ये 8 सिक्स आणि 5 फोर मारल्या. तर अभिषेक शर्माने 21 बॉलमध्ये 247.62 च्या स्ट्राईक रेटने आणि 3 सिक्स 6 फोरच्या मदतीने 52 रन केले. तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या इशान किशनने 25 बॉलमध्ये 54 रनची खेळी केली. याशिवाय शिवम दुबेने 8 बॉलमध्ये नाबाद 26 आणि हार्दिकने 13 बॉल 18 रन केले.
या संपूर्ण टी-20 वर्ल्ड कपमध्ये फॉर्मसाठी संघर्ष करणाऱ्या अभिषेक शर्माने फायनलमध्ये धमाका केला. अभिषेक आणि संजू या दोन ओपनरनी 7.1 ओव्हरमध्ये 98 रनची पार्टनरशीप केली. या ओपनिंग पार्टनरशीपसोबतच संजू आणि अभिषेकने मोठा विक्रम केला आहे.

17 वर्ष जुना विक्रम मोडला

टी-20 वर्ल्ड कप फायनलच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या टीमच्या ओपनरनी 50 रनची पार्टनरशीप केली आहे. याआधी टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये सर्वाधिक ओपनिंग पार्टनरशीप 48 रनची होती. 2009 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा ओपनर कामरान अकमल आणि शाहजीब हसन यांच्यात ही 48 रनची पार्टनरशीप झाली होती. आता 17 वर्षांनंतर अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनने हे रेकॉर्ड तोडलं आहे.
advertisement
या सामन्यात टीम इंडियाने फक्त 4 ओव्हरमध्येच 50 रनचा आकडा पार केला होता. संजू आणि अभिषेक यांनी पॉवर प्लेच्या 6 ओव्हरमध्ये 92 रन केले. टी-20 वर्ल्ड कप फायनलच्या इतिहासातला हा सगळ्यात मोठा पॉवर प्ले होता.
टीम इंडियाचा ओपनर अभिषेक शर्माने फायनलमध्ये 18 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. टी-20 वर्ल्ड कपच्या नॉक आऊट सामन्यातलं हे सगळ्यात जलद अर्धशतक आहे. याआधी फिन ऍलनने यंदाच्याच टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि इंग्लंडच्या जेकब बेथलने टीम इंडियाविरुद्ध 18 बॉलमध्येच अर्धशतक केलं होतं.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup : फायनलमध्ये अभिषेक-संजूने इतिहास घडवला, पाकिस्तानचा वर्ल्ड रेकॉर्ड भुईसपाट!
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement