advertisement

राज्यात अन् परराज्यात शोधलं अन् महिला दिनीच दिलं खास गिफ्ट, छ. संभाजीनगर पोलिसांची मोठी कामगिरी, Video

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar: अचानक हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. अनेकांनी पोलिसांचे आभार मानत कौतुक केले.

+
राज्यात

राज्यात अन् परराज्यात शोधलं अन् महिला दिनीच दिलं खास गिफ्ट, छ. संभाजीनगर पोलिसांची मोठी कामगिरी, Video

छत्रपती संभाजीनगर : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली. नागरिकांचे हरवलेले व चोरी गेलेले 16 मोबाईल फोन शोधून काढले आणि ते संबंधित मालकांना परत केले. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून पोलिसांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जवाहरनगर पोलीस ठाण्याकडे मोबाईल हरविल्याच्या व चोरीच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींच्या आधारे पोलिसांनी तांत्रिक तपास आणि विशेष पथकाच्या मदतीने शोधमोहीम राबवली. या तपासादरम्यान काही मोबाईल फोन जिल्ह्यातील विविध भागांतून तर काही मोबाईल बाहेरील राज्यातून शोधून काढण्यात पोलिसांना यश आले.
advertisement
शोधून काढलेल्या या 16 मोबाईल फोनचे वितरण आज जवाहरनगर पोलीस ठाण्यात आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. या वेळी पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या हस्ते संबंधित नागरिकांना त्यांचे मोबाईल फोन सुपूर्द करण्यात आले.
विशेष म्हणजे महिला दिनाचे औचित्य साधत परत करण्यात आलेल्या एकूण मोबाईलपैकी 9 मोबाईल महिला तक्रारदारांना देण्यात आले. अचानक हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. अनेकांनी पोलिसांचे आभार मानत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
advertisement
दरम्यान, नागरिकांनी मोबाईल हरविल्यास त्वरित पोलिसांकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे. जवाहरनगर पोलिसांच्या या उपक्रमामुळे नागरिकांनी त्यांचं कौतुक देखील केलेला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
राज्यात अन् परराज्यात शोधलं अन् महिला दिनीच दिलं खास गिफ्ट, छ. संभाजीनगर पोलिसांची मोठी कामगिरी, Video
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement