advertisement

रिक्षा ड्रायव्हरच्या लेकीनं ठरवलं अन् गाव बदललं, खाकी वर्दीनं दिली मुलींना दिशा, नंदिनीच्या जिद्दीची कहाणी, Video

Last Updated:

Womens Day 2026: नंदिनीने मुलींसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून तिच्याकडे बघून गावातील मुलींना शिक्षणासाठी बाहेर पाठवू लागले आहेत.

+
रिक्षा

रिक्षा ड्रायव्हरच्या लेकीनं ठरवलं अन् गाव बदललं, खाकी वर्दीनं दिली मुलींना दिशा, नंदिनीच्या जिद्दीची कहाणी, Video

मुंबई: सध्याच्या काळात महिला विविध क्षेत्रात उत्तुंग झेप घेत असल्याचं दिसतं. मात्र अजूनही काही गावखेड्यांतील भागात वेगळं वास्तव पाहायला मिळतं. कल्याण ग्रामीण भागात मुली 18 वर्षाच्या झाल्या की त्यांचे दोनाचे चार हात करून मोकळं व्हायचं अशीच अनेकांची भूमिका असते. त्यामुळे उच्चशिक्षण, नोकरी याकडे फारसा कल दिसत नाही. परंतु, या सगळ्यावर मात करत नंदिनी भंडारी हिनं 19 व्या वर्षी खाकी वर्दीचं स्वप्न साकार केलं आहे. आज 8 मार्च जागतिक महिला दिनी, लोकल18 च्या माध्यमातून नंदिनीची प्रेरणादायी कहाणी जाणून घेऊया.
नंदिनी भंडारी हिची घरची परिस्थिती बेताची आहे. आई अंजू भंडारी या गृहिणी तर वडील दिनेश भंडारी रिक्षा चालवतात. परंतु, मुलीची शिकण्याची जिद्द आणि धाडस बघून आई-वडिलांनी तिला शिकवण्याचा निर्णय घेतला. बारावीनंतर परिस्थितीमुळे तिला पुढे शिकवणं शक्य नव्हतं. परंतु, तिचं खाकी वर्दीचं स्वप्न साकार करण्यासाठी आई-वडिलांनी पुढाकार घेतला.
advertisement
नंदिनीला पोलीस भरतीसाठी 12 वीनंतर अकॅडमीमध्ये जायचं होतं. या भागात मुलींना शिक्षणासाठी बाहेर ठेवणं टाळलं जातं. समाजाच्या भीतीपोटी तिच्या आई-वडिलांनी देखील ते धाडस केलं नाही. मात्र तिचे वडील रोज तिला घेऊन अकॅडमीत जात आणि परत घेऊन येत. तिनंही जिद्दीनं अभ्यास आणि सराव करून खाकी वर्दीचं स्वप्न साकार केलं. 2024 मध्ये ती 19 व्या वर्षी कल्याण ग्रामीण भागातील पहिली महिला पोलीस झाली. वडिलांनंतर कुटुंबाची जबाबदारी देखील तिनं आपल्या खांद्यावर घेतली आहे.
advertisement
ज्या भागात मुलींना शिकवणं अजूनही टाळलं जात होतं. तिथे स्वत: शिकून नोकरी करत नंदिनी वडिलांसह कुटुंबाची जबाबदारी देखील सांभाळत आहे. तिने इथल्या मुलींसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून नंदिनीकडे बघून गावातील मुलींना शिक्षणासाठी बाहेर पाठवू लागले आहेत. हेच तिच्या कर्तृत्वाचे मोठं यश असल्याचं नंदिनी सांगते.
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
रिक्षा ड्रायव्हरच्या लेकीनं ठरवलं अन् गाव बदललं, खाकी वर्दीनं दिली मुलींना दिशा, नंदिनीच्या जिद्दीची कहाणी, Video
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement