जर पाकिस्तानने बॉयकॉट केलं तर....
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने जर आयसीसीला लेखी कळवलं नाही, तर तांत्रिकदृष्ट्या ही मॅच वेळापत्रकाप्रमाणे 'अॅक्टिव्ह' मानली जाईल. आयसीसी सध्या पीसीबीकडून औपचारिक पत्राची प्रतीक्षा करत आहे. जोपर्यंत अधिकृत माहिती मिळत नाही, तोपर्यंत जागतिक क्रिकेट संस्था कोणतीही ठोस पावलं उचलू शकत नाही. यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना जर पाकिस्तानने बॉयकॉट केला तर पाकिस्तानच्या हातून दोन पाईंट्स जातील त्यामुळे त्यांना उर्वरित तीन सामन्यांच्या जोरावर सेमीफायनलपर्यंत पोहोचावं लागेल.
advertisement
कसं असेल पाकिस्तानचं सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचं गणित?
पाकिस्तानचा पहिला सामना नेदरलँड्सविरुद्ध 7 फेब्रुवारी होणार आहे. तर दुसरा सामना अमेरिकाविरुद्ध 10 फेब्रुवारीला असेल. त्यानंतर भारताविरुद्ध सामना होणार आहे, पण पाकिस्तानने आडमुठी भूमिका घेतली आहे. त्यानंतर 18 फेब्रुवारीला पाकिस्तानचा सामना नामिबियाशी होईल. पाकिस्तानला काहीही करून तिन्हीच्या तिन्ही सामने जिंकावे लागणार आहे. पण नेदरलँड्स पाकिस्तानचा टांगा पटली करू शकतो. या स्पर्धेत नेदरलँड्सला डार्क हॉर्स मानले जात आहे. नेदरलँड्सने 2022 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेला हरवलं आणि 2009 मध्ये नेदरलँड्सने इंग्लंडलाही हरवलं होतं. त्यामुळे पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालंय.
सलमान आगा टॉससाठी मैदानात आला नाही, तर...
नियमांनुसार, टीम इंडियाचे कॅप्टन सूर्यकुमार यादव यांना मॅचच्या आदल्या दिवशी प्रेस कॉन्फरन्सला उपस्थित राहावे लागेल. इतकेच नाही तर, मॅचच्या दिवशी सूर्याला टॉस साठी मैदानात उतरावे लागेल. जर पाकिस्तानचा कॅप्टन सलमान अली आगा टॉससाठी मैदानात आला नाही, तर रेफरी भारताला 'वॉकओवर' देऊन विजयी घोषित करतील आणि भारताच्या खात्यात 2 पॉइंट्स जमा होतील. त्यामुळे भारताला मात्र याची काळजी नाही. पण पाकिस्तानला मोठा फटका बसेल.
