TRENDING:

Sanju Samson : 'मी पूर्णपणे तुटलो तेव्हा...' क्रिकेटचा देव मदतीला आला, इमोशनल संजूने सांगितली सचिनची स्टोरी

Last Updated:

लागोपाठ दुसरा टी-20 वर्ल्ड कप जिंकून टीम इंडियाने इतिहास घडवला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या फायनलमध्ये टीम इंडियाने 96 रननी विजय मिळवला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अहमदाबाद : लागोपाठ दुसरा टी-20 वर्ल्ड कप जिंकून टीम इंडियाने इतिहास घडवला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या फायनलमध्ये टीम इंडियाने 96 रननी विजय मिळवला. भारताने दिलेल्या 256 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा 19 ओव्हरमध्ये 159 रनवर ऑलआऊट झाला. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या तर अक्षर पटेलला 3 विकेट मिळाल्या, याशिवाय हार्दिक पांड्या, वरुण चक्रवर्ती आणि अभिषेक शर्मा यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.
'मी पूर्णपणे तुटलो तेव्हा...' क्रिकेटचा देव मदतीला आला, इमोशनल संजूने सांगितली सचिनची स्टोरी
'मी पूर्णपणे तुटलो तेव्हा...' क्रिकेटचा देव मदतीला आला, इमोशनल संजूने सांगितली सचिनची स्टोरी
advertisement

या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सॅन्टनरने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर भारताने 20 ओव्हरमध्ये 255/5 एवढा स्कोअर केला. संजू सॅमसनने 46 बॉलमध्ये 89, अभिषेक शर्माने 21 बॉलमध्ये 52 आणि इशान किशनने 25 बॉलमध्ये 54 रनची खेळी केली, याशिवाय शिवम दुबेने 8 बॉलमध्ये 26 रन केले.

संजू सॅमसनने वेस्ट इंडिजविरुद्धचा करो या मरो सामना, इंग्लंडविरुद्धची सेमी फायनल आणि न्यूझीलंडविरुद्धची फायनल अशा लागोपाठ 3 सामन्यांमध्ये संजूने 3 अर्धशतकं केली. या कामगिरीबद्दल संजूला प्लेअर ऑफ द सीरिज देऊन गौरवण्यात आलं. या पुरस्काराचं श्रेय संजू सॅमसनने सचिन तेंडुलकरला दिलं आहे.

advertisement

काय म्हणाला संजू?

'हे स्वप्नासारखं वाटत आहे. मी खूप आनंदी आणि कृतज्ञ आहे. हा प्रवास एक-दोन वर्षांपूर्वी सुरू झाला, मी 2024 च्या वर्ल्ड कप टीममध्ये होतो, पण मला खेळण्याची संधी मिळाली नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजनंतर मी तुटलो. मला स्वप्न भंगल्यासारखं वाटलं, मी काय करू, असा विचार सतत येत होता, पण देवाच्या योजना वेगळ्या होत्या', असं वक्तव्य संजूने केलं.

advertisement

'स्वप्न पाहण्यासाठी धाडसी असल्यामुळे मला त्याचं बक्षीस मिळालं. अनेक माजी खेळाडूंनी माझ्यासोबत संपर्क साधला आणि मला मदत केली. मागच्या काही महिन्यांपासून मी सचिन सरांसोबत संपर्कात होतो. मी त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्यासोबत गप्पा मारल्या. त्यांच्यासारख्या एखाद्याकडून मार्गदर्शन मिळाल्यानंतर तुम्ही आणखी काय मागू शकता?' असं संजू म्हणाला आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
बारावीत दोनदा नापास, 7 वर्षे ड्रायव्हिंग, शेतकऱ्याच्या लेकानं ठरवलं, झाला फौजदार
सर्व पहा

'मला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाचा मी खूप आभारी आहे. माझ्यासाठी हा विजय खूप मोठा आहे, मला याचा आनंद घ्यायचा आहे. त्यानंतर काही दिवसांनी मला कळेल, की आणखी काय करायचं आहे', अशी प्रतिक्रिया संजूने दिली आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Sanju Samson : 'मी पूर्णपणे तुटलो तेव्हा...' क्रिकेटचा देव मदतीला आला, इमोशनल संजूने सांगितली सचिनची स्टोरी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल