TRENDING:

IND vs PAK : पाकिस्तानचा बहिष्कार, तरी टीम इंडियाची फ्लाईट श्रीलंकेला जाणार... कॅप्टन सूर्याने खेळली सगळ्यात मोठी चाल!

Last Updated:

शनिवार 7 फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंकेमध्ये टी-20 वर्ल्ड कपला सुरूवात होत आहे, पण अजूनही भारत-पाकिस्तान सामना होणार का नाही? याबाबत संभ्रम आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : टी-20 वर्ल्ड कप सुरू व्हायला आता 48 तासांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. शनिवार 7 फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंकेमध्ये टी-20 वर्ल्ड कपला सुरूवात होत आहे, पण अजूनही भारत-पाकिस्तान सामना होणार का नाही? याबाबत संभ्रम आहे. पाकिस्तान सरकारने 15 फेब्रुवारीला होणाऱ्या भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकत असल्याची घोषणा केली. यानंतर आयसीसीने पाकिस्तान क्रिकेटला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला.
पाकिस्तानचा बहिष्कार, तरी टीम इंडियाची फ्लाईट श्रीलंकेला जाणार... कॅप्टन सूर्याने खेळली सगळ्यात मोठी चाल!
पाकिस्तानचा बहिष्कार, तरी टीम इंडियाची फ्लाईट श्रीलंकेला जाणार... कॅप्टन सूर्याने खेळली सगळ्यात मोठी चाल!
advertisement

भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल संभ्रम निर्माण झालेला असतानाच टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने या वादावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. 15 फेब्रुवारीसाठी कोलंबोचं आमचं विमान तिकीट बुक झालं आहे, आम्ही तिकडे जाऊ आणि पाहू काय होतंय, असं सूर्यकुमार यादव वर्ल्ड कपआधी झालेल्या पत्रकार परिषदेत म्हणाला आहे.

मागच्या आठवड्यात पाकिस्तान सरकारने सोशल मीडियावर पोस्ट करून भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकत असल्याचं जाहीर केलं, त्यानंतर आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी बांगलादेशला वर्ल्ड कपमधून बाहेर काढल्यामुळे आम्ही भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकत असल्याचं विधान केलं आहे.

advertisement

भारत श्रीलंकेला का जाणार?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्याची कमाल, 3 एकरमध्ये घेतलं तब्बल 45 क्विंटल तुरीचे उत्पादन, Video
सर्व पहा

पाकिस्तानने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकला असला तरी भारतीय टीम श्रीलंकेला 15 फेब्रुवारीच्या सामन्यासाठी जाणार आहे, याचं कारण आहे 2 पॉईंट्स. पाकिस्तानने मॅचवर बहिष्कार टाकला तरी भारताला या मॅचसाठी कोलंबोला जावं लागेल, त्यानंतर सूर्यकुमार यादव 15 तारखेला टॉससाठी मैदानात येईल, पण पाकिस्तान मैदानात उतरलं नाही तर मॅच रेफ्री भारताला मॅचचे 2 पॉईंट्स देईल. दुसरीकडे भारतीय टीमही श्रीलंकेमध्ये गेली नाही आणि मैदानात उतरली नाही, तर नियमानुसार दोन्ही टीमना एक-एक पॉईंट दिला जाईल, त्यामुळे सूर्यकुमार यादवने आमच्या विमानाचं तिकीट बुक झालं असून आम्ही कोलंबोला जाणार असल्याचं सांगितलं आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : पाकिस्तानचा बहिष्कार, तरी टीम इंडियाची फ्लाईट श्रीलंकेला जाणार... कॅप्टन सूर्याने खेळली सगळ्यात मोठी चाल!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल