TRENDING:

Team India : ग्रुप ऑफ 'डेथ'मध्ये अडकले सूर्याचे शिलेदार, एका टीमविरुद्ध विजयासाठी बदलावा लागणार इतिहास!

Last Updated:

2026 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची कामगिरी आतापर्यंत बरीच चांगली राहिली आहे. सलग चार विजयांसह भारतीय टीमने सुपर-8 मध्ये प्रवेश केला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अहमदाबाद : 2026 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची कामगिरी आतापर्यंत बरीच चांगली राहिली आहे. सलग चार विजयांसह भारतीय टीमने सुपर-8 मध्ये प्रवेश केला. सुपर-8 मध्ये टीम इंडिया ग्रुप 1 मध्ये आहे, पण टीम इंडियाच्या या ग्रुपला ग्रुप ऑफ डेथ म्हणूनही संबोधलं जात आहे. या ग्रुपमध्ये भारत, दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज यांचा समावेश आहे. या टी-20 वर्ल्ड कपमध्ये या सर्व टीम सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत.
ग्रुप ऑफ 'डेथ'मध्ये अडकले सूर्याचे शिलेदार, एका टीमविरुद्ध विजयासाठी बदलावा लागणार इतिहास!
ग्रुप ऑफ 'डेथ'मध्ये अडकले सूर्याचे शिलेदार, एका टीमविरुद्ध विजयासाठी बदलावा लागणार इतिहास!
advertisement

"ग्रुप ऑफ डेथ" मध्ये टीम इंडिया

ग्रुप 1 मधील या चारही टीम एकही सामना न गमावता सुपर-8 मध्ये पोहोचल्या आहेत. पाकिस्तान, अमेरिका, नेदरलँड्स आणि नामिबियाला हरवून भारताने ग्रुप ए मध्ये अव्वल स्थान पटकावले. ग्रुप डी मध्ये दक्षिण आफ्रिकेने त्यांचे सर्व सामने जिंकले. ग्रुप सी मध्ये वेस्ट इंडिजनेही सलग चार विजय नोंदवले. दरम्यान, ग्रुप बी मध्ये तीन विजय आणि एक अनिर्णित सामन्यासह झिम्बाब्वे अपराजित राहिली.

advertisement

टीम इंडियाला इतिहास बदलावा लागणार

सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी प्रत्येक टीमला त्यांची विजयी घोडदौड कायम ठेवावी लागेल, पण टीम इंडियासाठी हा प्रवास सोपा नसेल. दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे उत्तम फॉर्ममध्ये आहेत. तर वेस्ट इंडिजविरुद्ध विजय मिळवण्यासाठी टीम इंडियाला इतिहास बदलावा लागणार आहे. टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात टीम इंडियाला वेस्ट इंडिजविरुद्ध फक्त एकच मॅच जिंकता आली आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये दोन्ही टीम चार वेळा एकमेकांसमोर आल्या आहेत, ज्यात वेस्ट इंडिजचा 3 वेळा आणि भारताचा एकदा विजय झाला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Tata आता करणार मार्केट जाम, आणली 468 किमी मायलेजदार SUV; किंमतही 6 लाखांपासून
सर्व पहा

सुपर-8 मध्ये भारताचा वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना हा सगळ्यात शेवटी 1 मार्चला होणार आहे. तर भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 22 फेब्रुवारी आणि झिम्बाब्वेविरुद्धचा सामना 26 फेब्रुवारीला होईल. ग्रुप 2 मध्ये पाकिस्तान, न्यूझीलंड, इंग्लंड आणि श्रीलंका यांचा समावेश आहे. सुपर-8 च्या दोन ग्रुपमधील टॉप-2 टीम सेमी फायनलमध्ये प्रवेश करतील. सेमी फायनलमध्ये विजय मिळवलेल्या दोन टीम 8 मार्चला टी-20 वर्ल्ड कपची फायनल खेळेल.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Team India : ग्रुप ऑफ 'डेथ'मध्ये अडकले सूर्याचे शिलेदार, एका टीमविरुद्ध विजयासाठी बदलावा लागणार इतिहास!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल