TRENDING:

वनडे वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात मोठा धमाका, लेडी सेहवागची हकालपट्टी, स्मृतीला मोठी जबाबदारी!

Last Updated:

भारतामध्ये होणाऱ्या महिला वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली आहे. वनडे वर्ल्ड कपसाठी हरमनप्रीत कौर टीम इंडियाची कर्णधार तर स्मृती मंधाना उपकर्णधार असेल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : भारतामध्ये होणाऱ्या महिला वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली आहे. वनडे वर्ल्ड कपसाठी हरमनप्रीत कौर टीम इंडियाची कर्णधार तर स्मृती मंधाना उपकर्णधार असेल. शेफाली वर्माला मात्र भारतीय टीममध्ये स्थान मिळालेलं नाही. क्रांती गौड, अमनजोत कौर, राधा यादव, श्री चरणी या खेळाडूंची टीममध्ये निवड झाली आहे.
वनडे वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात मोठा धमाका, लेडी सेहवागची हकालपट्टी, स्मृतीला मोठी जबाबदारी!
वनडे वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात मोठा धमाका, लेडी सेहवागची हकालपट्टी, स्मृतीला मोठी जबाबदारी!
advertisement

'शेफाली ऑस्ट्रेलिया ए सीरिजमध्ये खेळली होती. आमचं लक्ष तिच्यावर आहे. ती खेळेल आणि अनुभव मिळवेल, त्यामुळे भारताला 50 ओव्हरच्या फॉरमॅटमध्ये मदत मिळेल', अशी प्रतिक्रिया निवड समितीने दिली आहे. तर दुसरीकडे कर्णधार हरमनप्रीत कौरने टीम निवडीवर भाष्य केलं आहे. 'पॉवरप्लेमध्ये रेणुका आणि क्रांती आहे, स्लॉग ओव्हरमध्ये श्री चरणी, दीप्ती आणि राधा तर मधल्या ओव्हरमध्ये स्नेह राणा आहे. आम्ही टीममध्ये फार बदलाव केले नाहीत, कारण आम्हाला सातत्य हवं आहे', असं हरमनप्रीत कौर म्हणाली आहे.

advertisement

महिला वनडे वर्ल्ड कपला 30 सप्टेंबरपासून सुरूवात होत आहे, ज्यात एकूण 8 टीम सहभागी होणार आहेत. भारत-पाकिस्तानमध्ये वाढलेल्या तणावामुळे पाकिस्तानच्या सगळ्या मॅच श्रीलंकेमध्ये होणार आहेत. भारतीय महिला टीमला अजून एकदाही वर्ल्ड कपची ट्रॉफी जिंकता आलेली नाही, त्यामुळे भारतात होणाऱ्या या स्पर्धेत विश्वविजेता होण्याची संधी महिला ब्रिगेडकडे चालून आली आहे. वनडे वर्ल्ड कपआधी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध 14 सप्टेंबरपासून वनडे सीरिज खेळणार आहे, त्यासाठीही टीमची घोषणा करण्यात आली आहे.

advertisement

वर्ल्ड कपसाठी भारतीय टीम

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, रेणुका सिंग ठाकूर, अरुंधती रेड्डी, ऋचा घोष (विकेट कीपर), क्रांती गौड, अमनजोत कौर, राधा यादव, श्री चरणी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजसाठी भारतीय टीम

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, जेमिमा रोड्रिग्ज, रेणुका सिंग ठाकूर, अरुंधती रेड्डी, ऋचा घोष (विकेट कीपर), क्रांती गौड, सयाली सतघरे, राधा यादव, श्री चरणी, यास्तिका भाटिया (विकेट कीपर), स्नेह राणा

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
वनडे वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात मोठा धमाका, लेडी सेहवागची हकालपट्टी, स्मृतीला मोठी जबाबदारी!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल