वरुण चक्रवर्ती मागच्या 12 महिन्यांपासून भारताच्या टी-20 टीमचा महत्त्वाचा भाग आहे. गौतम गंभीर टीम इंडियाचा हेड कोच बनताच 34 वर्षांच्या वरुणला टीम इंडियामध्ये संधी मिळाली. मिस्ट्री स्पिनर असलेल्या वरुण चक्रवर्तीनेही त्याला मिळालेल्या या संधीचं सोनं केलं. 2021 च्या टी-20 वर्ल्ड कपमधल्या निराशाजनक कामगिरीनंतर वरुणला टीमबाहेर केलं गेलं होतं, पण दुसरी संधी मिळताच त्याने मागे वळून पाहिलं नाही.
advertisement
अभिषेक शर्माही टॉपवर
वरुण चक्रवर्तीशिवाय टीम इंडियाचा ओपनर अभिषेक शर्माही टी-20 क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. अभिषेकने मागच्या वर्षभरात धमाकेदार कामगिरी केली आहे, त्यामुळे यंदाच्या क्रमवारीमध्ये अभिषेकने 884 रेटिंग पॉईंट्ससह पहिला क्रमांक मिळवला आहे. तर इंग्लंडचा फिल सॉल्ट दुसऱ्या आणि जॉस बटलर तिसऱ्या क्रमांकावर आहे. तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांचं मात्र टी-20 क्रमवारीमध्ये नुकसान झालं आहे. तिलक दोन स्थान खाली चौथ्या क्रमांकावर आणि सूर्यकुमार यादव एक स्थान खाली सातव्या क्रमांकावर आला आहे.
हार्दिक पांड्या टॉप ऑलराऊंडर
याशिवाय ऑलराऊंडरच्या टी-20 क्रमवारीमध्येही भारतीय खेळाडूच अव्वल आहे. टीम इंडियाचा स्टार खेळाडू हार्दिक पांड्या आयसीसीच्या ऑलराऊंडरच्या टी-20 क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.
टीम इंडिया नंबर वन
आंतरराष्ट्रीय टी-20 क्रमवारीमध्येही टीम इंडिया पहिल्या क्रमांकावर आहे. तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या, इंग्लंड तिसऱ्या, न्यूझीलंड चौथ्या क्रमांकावर आहे. आयसीसीच्या ताज्या क्रमवारीमध्ये बॅटर, बॉलर, ऑलराऊंडर तसंच टीमही नंबर वन होण्याचा विक्रम भारताने केला आहे.