Pune News: धुणी-भांडी ते बंदोबस्त, पुणेकर सर्वसामान्य महिला पोलिसांसोबत ड्युटीला; 25 वर्षांची निस्वार्थ सेवा

Last Updated:

25 वर्षांपासून ही संघटना पोलीस दलाला मदत करत आहे. बंदोबस्तासाठी पोलिसांची संख्या अपुरी पडली की, या संघटनेतील महिला पुढे सरसावतात.

+
News18

News18

पुणे : सामान्यतः पोलीस नागरिकांच्या मदतीला धाव घेतात. काही अडचणी असतील तर त्या सोडवतात. पण पुण्यात एक अशी संघटना आहे जी पोलिसांना मदत करते, पोलिसांच्या अडचणी सोडवते. त्या संघटनेचं नाव आहे, अखिल महाराष्ट्र महिला पोलीस संघटना. गेल्या 25 वर्षांपासून ही संघटना पोलीस दलाला मदत करत आहे. बंदोबस्तासाठी पोलिसांची संख्या अपुरी पडली की, या संघटनेतील महिला पुढे सरसावतात. कोरोना काळात तर त्यांनी मोठ्या प्रमाणावर पोलिसांना साथ दिली, विशेष म्हणजे हे काम त्या पूर्णपणे विनामूल्य करतात. त्यांच्या या कार्याविषयीची माहिती संघटनेच्या अध्यक्षा कांता पवार यांनी लोकल 18 ला दिली आहे.
पोलिसांच्या मदतीसाठी कायम तत्पर असलेली संघटना
अखिल महाराष्ट्र महिला पोलीस संघटनेची स्थापना 1 जानेवारी 2005 साली करण्यात आली. संघटनेच्या स्थापनेची कल्पना कांता पवार यांना एका पेपरमधील बातमी पाहून सुचली. त्या बातमीत मित्र पोलीस संघटना असल्याचे सांगितले होते. त्यावर विचार करून कांता पवार यांनी ठरवले, महिला संघटना का नाही? आणि या प्रश्नाच्या शोधार्थ संघटनेची सुरुवात झाली. कांता पवार यांनी नातेवाईक, शेजारी आणि मित्रमंडळी यांच्या मदतीने 11 महिलांपासून संघटना सुरू केली. आज 2025 मध्ये या संघटनेत 400 हून अधिक महिला सहभागी आहेत आणि त्या सतत सर्वसामान्यांच्या मदतीसाठी पोलिसांच्या सहकार्याला धाव घेत आहेत.
advertisement
25 वर्षांपासून निस्वार्थ सेवा...
या संघटनेमार्फत पुण्यातील विविध पोलीस स्टेशनला निवेदन दिले जाते आणि पोलिसांना जेव्हा कोणत्याही प्रकारची मदत आवश्यक असते, तेव्हा या महिला तत्परतेने सहकार्य करतात. गेल्या 25 वर्षांपासून गणेशोत्सव, नवरात्र उत्सव, पालखी सोहळा, निवडणुका अशा महत्त्वाच्या ठिकाणी या महिला पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत असतात.
advertisement
कोरोना काळातही या महिला संघटनेने पोलिसांना मोठ्या प्रमाणात मदत केली. बंदोबस्ताची जबाबदारी असो किंवा इतर शासकीय कामकाज, या महिला अहोरात्र काम करत होत्या. इतकेच नव्हे, तर नागरिकांच्या छोट्या-मोठ्या तक्रारी आल्यास त्या सोडवण्याचा प्रयत्नदेखील या महिला करतात.
विशेष म्हणजे, या संघटनेतील महिला सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. कुणी धुणी-भांडी करून उदरनिर्वाह करतात, तर कुणी स्वयंपाकाची कामे करतात. आर्थिक परिस्थिती बेताची असली तरीही समाजाचे काहीतरी देणं लागतो या भावनेतून त्या हे कार्य करत आहेत. या महिलांनी थोडेफार मानधन देण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
मराठी बातम्या/पुणे/
Pune News: धुणी-भांडी ते बंदोबस्त, पुणेकर सर्वसामान्य महिला पोलिसांसोबत ड्युटीला; 25 वर्षांची निस्वार्थ सेवा
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement