Asia Cup : तारीख अन् वेळही ठरली! भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा हाय व्होल्टेज लढत, इथे पाहा सुपर-4चं टाईम टेबल!

Last Updated:
आशिया कपच्या सुपर-4 चं चित्र हळूहळू स्पष्ट व्हायला लागलं आहे. ग्रुप स्टेजनंतर आता सुपर-4मध्येही भारत-पाकिस्तानमध्ये सामना होण्याची शक्यता बळावली आहे.
1/5
आशिया कपमध्ये ग्रुप ए मधून टीम इंडिया आधीच सुपर-4 मध्ये पोहोचली आहे. तर आज पाकिस्तान आणि युएईमध्ये होणाऱ्या सामन्यानंतर या दोघांपैकी एक टीम सुपर-4मध्ये प्रवेश करेल.

advertisement
2/5
या सामन्यामध्ये पाकिस्तानचा विजय झाला तर ग्रुप ए मधून भारत आणि पाकिस्तान या दोन टीम सुपर-4मध्ये पोहोचतील, पण हा सामना युएईने जिंकला तर मात्र पाकिस्तानचं आशिया कपमधील आव्हान संपुष्टात येईल. आणि युएई सुपर-4मध्ये पोहोचणारी दुसरी टीम ठरेल.

3/5
रविवार 21 सप्टेंबरला सुपर-4 मधील A1 विरुद्ध A2 यांच्यात सामना होईल. म्हणजेच ग्रुप ए मधून पाकिस्तानने सुपर-4 ला प्रवेश केला, तर भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा रविवारीच लढत होईल. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता दुबईमध्ये खेळवला जाणार आहे.

4/5
दुसरीकडे ग्रुप बी मधून अजून कोणतीच टीम सुपर-4 मध्ये पोहोचली नाही. ग्रुप बी मध्ये श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्यात सुपर-4 मध्ये पोहोचण्यासाठी जोरदार स्पर्धा सुरू आहे. गुरूवारी श्रीलंका-अफगाणिस्तान यांच्यातल्या सामन्यानंतरच ग्रुप बी मधून प्ले-ऑफला कोण पोहोचणार? हे निश्चित होईल.

5/5
गुरूवारी श्रीलंकेने अफगाणिस्तानचा पराभव केला, तर श्रीलंका आणि बांगलादेश या दोन टीम सुपर-4 मध्ये प्रवेश करतील. पण या सामन्यात अफगाणिस्तानचा विजय झाला, तर नेट रनरेटवर श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या 2 टीम सुपर-4 मध्ये जातील.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement