Do You Know : भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक Toll Naka? टोल का आणि कशासाठी भरावा लागतो?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
आजच्या घडीला भारतात हजाराहून अधिक टोल प्लाझा आहेत. मात्र, तुम्हाला माहिती आहे का की देशातील सर्वाधिक टोल प्लाझा कोणत्या राज्यात आहेत?
advertisement
advertisement
advertisement
राजस्थान हे सर्वाधिक टोल प्लाझांचा राज्य आहे. येथे तब्बल 156 टोल प्लाझा आहेत. राजस्थानाचं क्षेत्रफळ मोठं आहे आणि रस्त्यांचं जाळंही विस्तृत आहे. वाळवंटी भाग मोठ्या प्रमाणात असल्याने येथील लोकांना चांगल्या वाहतूक सुविधांसाठी लांब आणि मजबूत महामार्गांची गरज आहे. त्याशिवाय, राजस्थान हे गुजरात आणि मध्य प्रदेशला जोडणाऱ्या महत्त्वाच्या कॉरिडॉरचं केंद्र आहे. त्यामुळे येथे टोल प्लाझांची संख्या जास्त असणं स्वाभाविक आहे.
advertisement
महत्त्वाचे राष्ट्रीय महामार्ग
दिल्ली-जयपूर (एनएच 48) सारखे प्रमुख महामार्ग आणि गुजरात, मध्य प्रदेशकडे जाणारे आंतरराज्यीय रस्ते राजस्थानमधून जातात. त्यामुळे राजस्थान राष्ट्रीय वाहतुकीचं एक महत्त्वाचं केंद्र मानलं जातं. येथे टोल संग्रह केल्याने वाहतूक व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधा दोन्हींचा दर्जा टिकवून ठेवता येतो.

आजकाल फास्टॅग आणि जीपीएस आधारित टोल वसुली प्रणाली आल्याने वेळेची मोठी बचत होते. वारंवार प्रवास करणाऱ्यांना वार्षिक पास मिळतो ज्यामुळे वर्षभरात 200 प्रवास सोप्या पद्धतीने करता येतात. थोडक्यात काय, तर गाड्यांचा वापर जितका वाढतोय तितकी टोल नाक्यांची गरज वाढत आहे. प्रवाशांना चांगले रस्ते आणि सोयीस्कर प्रवास मिळावा यासाठी टोल नाक्यांवरून वसूल होणारा पैसा महत्त्वाची भूमिका बजावतो.