India U19 vs Australia U19 : ब्रिस्बेनमधील इयान हिली ओव्हलमधल्या दुसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाने 51 धावांनी ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. या विजयासह टीम इंडियाने 2-0 ने मालिका खिशात घातली आहे. या सामन्यात टीम इंडियाचा सलामीवीर वैभव सुर्यवंशीने 70 धावांची धडाकेबाज खेळी केली होती. पण इतकी मोठी खेळी करून देखील टीम इंडियाचा दुसराच खेळाडू क्रेडिट घेऊन गेला आहे.
advertisement
खरं तर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर 300 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सूरूवात खूपच खराब झाली होती.ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर आलेक्स टर्नर 24 आणि सिमोन बज 14 अशा स्वस्तात बाद झाले होते. त्यानंतर भारतीय गोलंदाजी ऑस्ट्रेलियाला सावरण्याची अजिबात संधी दिली नाही आणि एकामागून एक विकेट काढायला सूरूवात केली होती.
5 विकेट पडल्यानंतर जयडेन ड्रपरने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला होता. जयडनने 107 धावांची शतकीय खेळी केली होती. त्याला आर्यन शर्माने 38 धावा करून साथ देण्याचा प्रयत्न केला. पण एका मागून एक विकेट पडत असल्याने ऑस्ट्रेलिया 249 धावांवर ऑल आऊट झाली होती. त्यामुळे टीम इंडियाने 51 धावांनी हा सामना जिंकला होता.
टीम इंडियाकडून कर्णधार आयुष म्हात्रेने तीन विकेट घेतले होते. कनिष्क चौहान 2 विकेट तर किशन कुमार, आर अम्ब्रीश,खिलन पटेल आणि विहान मल्होत्राने प्रत्येकी 1 विकेट घेतली होती.
टीम इंडियाची प्रथम फलंदाजी करताना खराब सुरूवात झाली होती. कारण कर्णधार आयुष म्हात्रे शुन्यावर बाद झाला होता.त्यानंतर वैभव सुर्यवंशी आणि विहान मल्होत्राने भारताचा डाव सावरला होता. वैभव सुर्यवंशीने 68 बॉलमध्ये 70 धावा केल्या होत्या. या खेळी दरम्यान त्याच्या बॅटीतून 6 षटकार आणि 5 चौकार आले होते. त्याच्या पाठोपाठ विहान मल्होत्राने देखील 70 धावांची खेळी केली होती.
या दोन खेळाडूंसोबत विकेटकिपर अभिग्यान कुंडुने 64 बॉलमध्ये 71 धावांची खेळी केली होती. अभिग्यान कुंडूच्या बॅटीतून मोक्याच्या क्षणी आलेल्या अर्धशतकीय खेळीमुळे टीम इंडियाचा डाव 300 पर्यंच पोहोचू शकला.त्यामुळे वैभवने जरी धडाकेबाज खेळी केली असली तरी अभिग्यान कुंडू भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
दरम्यान तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताने 2-0 ने आघाडी घेतली आहे.त्यामुळे एकप्रकारे भारताने ही मालिता खिशात घातली आहे.आता भारत तिसरा वनडे सामना जिंकून भारत क्लिनस्विप देते की ऑस्ट्रेलिया आपली अब्रु वाचवते?हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.