छंद असावा तर असा! नोकरी करत केले जुन्या शिवकालीन शस्त्रांचे जतन, ऐतिहासिक ठेव्याचा Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Niranjan Sherkar
Last Updated:
पुण्यातील सोहेल शेख हे पोलिस वसाहतीत वास्तव्य करतात. मागील 16 वर्षांपासून पुणे पोलिसात सेवा बजावणारे सोहेल शेख मोठे इतिहासप्रेमी आहेत.
पुणे: पुण्यातील पोलिस दलात सेवेत कार्यरत असलेले सोहेल शेख यांच्याकडे आजही शिवकालीन वैभव जपलेले आहे. त्यांच्या पूर्वजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात सचिव म्हणून सेवा बजावली होती. त्या काळातील अनेक दुर्मिळ शस्त्रास्त्रे आणि तलवारी, ढाल, खंजीर, वाघनखे ही शस्त्रे त्यांनी पुढच्या पिढ्यांसाठी काळजीपूर्वक जपून ठेवली आहेत. त्यांचा या ऐतिहासिक ठेव्याबाबतची अधिक माहिती सोहेल शेख यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
पुण्यातील सोहेल शेख हे पोलिस वसाहतीत वास्तव्य करतात. मागील 16 वर्षांपासून पुणे पोलिसात सेवा बजावणारे सोहेल शेख मोठे इतिहासप्रेमी आहेत. सोहेल शेख यांच्या घरात आजही शिवकालीन परंपरेचा ठेवा अनुभवायला मिळतो. शेख यांनी पूर्वजांच्या तलवारी, भाले, ढाली, दांडपट्टे, खंजीर आणि इतर शिवकालीन वस्तू जतन करून ठेवल्या आहेत. यातील शस्त्रांना 350 वर्षांहून अधिक इतिहास लाभलेला आहे. या शस्त्रांवर रेखीव कोरीव काम, राजचिन्हे आणि कारागिरीचे सुंदर नमुने दिसतात.
advertisement
सोहेल शेख यांचे पूर्वज छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात सचिव पदावर सेवा बजावलेली आहे. आपल्या पूर्वजांचा वारसा सांभाळताना शेख सांगतात की माझ्या पूर्वजांकडून माझ्यापर्यंत आलेली ही केवळ शस्त्र नाहीत, तर ही आमची संस्कृतीची, शौर्याची आणि परंपरेची ओळख आहे. पूर्वजांनी जपलेली ही ऐतिहासिक परंपरा पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवणे ही माझी जबाबदारी आहे.
advertisement
सोहेल शेख यांनी जतन केलेला हा खजिना म्हणजे इतिहास प्रेमींसाठी पर्वणी आहे. शेख यांचा हा ऐतिहासिक संग्रह पाहिल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा आणि त्याकरता शस्त्रांच्या ताकदीचा प्रत्यय येतो. सध्याच्या पिढीत अनेक ऐतिहासिक गोष्टी नामशेष होत असताना शेख यांच्याकडून या ऐतिहासिक गोष्टी जतन करणे म्हणजे समाजाला इतिहासाशी जोडून ठेवण्याचे कार्य ठरत आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 24, 2025 6:12 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
छंद असावा तर असा! नोकरी करत केले जुन्या शिवकालीन शस्त्रांचे जतन, ऐतिहासिक ठेव्याचा Video