खरं तर अंडर 19 वर्ल्ड कप 2026 हा नामिबिया आणि झिम्बाब्वेमध्ये खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. यामध्ये आयुष म्हात्रेवर कर्णधाराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आयुश म्हात्रेसह वैभव सूर्यवंशी देखील या संघात आहे. या स्पर्धेत भारताचा संघ न्यूझीलंड,अमेरिका आणि बांगलादेश यांच्या सोबत आहे. तर भारत सहावे विजेतेपद मिळवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे.
advertisement
वैभव सूर्यवंशी उत्कृष्ट फॉर्ममध्ये
विजय हजारे स्पर्धेत बिहारकडून वैभव सूर्यवंशीने अरुणाचल प्रदेशविरुद्ध 84 चेंडूत 190 धावा काढल्या होत्या. या खेळी दरम्यान 16 चौकार आणि 15 षटकार मारले होते.यावेळी बिहारने 50 ओव्हरमध्ये 6 बाद 574 धावा केल्या होत्या.वैभवने केलेला लिस्ट ए क्रिकेटमध्ये हा एक विश्वविक्रम आहे. या खेळाडूने फक्त 36 चेंडूत तीन आकडी धावा केल्या आणि लिस्ट ए मध्ये शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू म्हणून विक्रम नोंदवला. त्यामुळे वैभव सूर्यवंशी उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे.
दरम्यान भारताच्या 15 सदस्यीय संघात आरोन जॉर्ज, अभिज्ञान कुंडू सारखे खेळाडू आहेत, ज्यांनी भारताच्या अंतिम फेरीत मोठे योगदान दिले. भारत 15 जानेवारी रोजी बुलावायोच्या क्वीन्स स्पोर्ट्स क्लब येथे अमेरिकेविरुद्ध स्पर्धेची सुरुवात करेल. त्यानंतर ते 17 जानेवारी रोजी बांगलादेशशी सामना करण्यासाठी त्याच ठिकाणी राहतील. आणि 24 जानेवारी रोजी न्यूझीलंडविरुद्ध गट सामने संपवतील.
अंडर 19 वर्ल्डकप 2026 साठी टीम इंडियाचा संघ :
आयुष म्हात्रे (कर्णधार), विहान मल्होत्रा (उप कर्णधार),वैभव सूर्यवंशी, आरोन जॉर्ज, वेदांत त्रिवेदी, अभिग्यान कुंडू (विकेटकिपर), हरवंश सिंह (विकेटकिपर), आर.एस. अम्ब्रीश, कनिश्क चौहान, खिलान पटेल , मोहम्मद इनान, हेनिल पटेल, डी दिपेश,
किशन सिंग,उद्धव मोहन
