TRENDING:

VIDEO : 1.32 लाख लोकं बघत होते, पण सूर्या अजिबात लाजला नाही, सर्वांसमोर झुकला आणि...भर मैदानात काय केलं?

Last Updated:

भारताच्या या ऐतिहासिक विजयानंतर सूर्यकुमार यादवने मैदानात एक गोष्ट केली. ही गोष्ट करताना तो अजिबात लाजला नाही. या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Team India won T20 world cup 2026 : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर टीम इंडियाने इतिहास रचला आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करत टी20 वर्ल्ड कप 2026 वर नाव कोरले आहे. टीम इंडियाने तिसऱ्यांदा वर्ल्ड कपवर नाव कोरले आहे. आणि सलग दुसऱ्या वर्ल्ड कप जिंकला आहे. आणि यजमान म्हणून वर्ल्डकप जिंकणारा पहिलाच संघ ठरला आहे. दरम्यान भारताच्या या ऐतिहासिक विजयानंतर सूर्यकुमार यादवने मैदानात एक गोष्ट केली. ही गोष्ट करताना तो अजिबात लाजला नाही. या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
surya kumar Yadav
surya kumar Yadav
advertisement

टीम इंडियाने दिलेल्या 255 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सूरूवात चांगली झाली नव्हती. कारण अक्षर पटेलने न्यूझीलंडचा घातक फलंदाज असलेल्या फिन अॅलेनला 9 धावांवर स्वस्तात बाद केले होते. त्याच्यानंतर रचिन रविंद्र मैदानात आला होता.पण बुमराह समोर त्याचाही निभाव लागला नाही आणि तो एक धावा करून बाद झाला.

अक्षर पटेलने पुन्हा स्ट्राईक घेऊन ग्लेन फिलिप्सला 5 धावांवर बाद केले होते. त्यानंतर आलेल्या मार्क चॅपमन 3 वर बाद झाले होते. टीम सिफर्ट एकटा न्यूझीलंडचा डाव सावरून होता, पण वरुन चक्रवर्तीने त्याला 52 धावांवर बाद केले होते. दरम्यान न्यूझीलंडचे 5 विकेट पडल्यानंतर डेरी मिचेल आणि कॅप्टन मिचेल सँटनरने डाव सावरण्याचा प्रयत्न केला होता. पण अक्षरने मिचेलला 17 वर बाद केले आणि नंतर बुमराहने मिचेल सँटनरला क्लिन बोल्ड करत 43 धावांवर बाद केले. या विकेटनंतर बुमराहने विकेटची रांगच लावली.

advertisement

बुमराहने नंतर जीमी निशम आणि मॅट हेन्रीला झटपट बाद केले.त्यानंतर अभिषेकने जेकॉब डफीची विकेट काढून न्यूझीलंडला 159 धावांवर ऑलआऊट करत हा सामना 96 धावांनी जिंकला होता.

advertisement

दरम्यान या विजयानंतर सु्र्या एक गोष्ट करायला अजिबात विसरला नाही. तो पीचवर गेला आणि त्याने मैदानात झूकून आपल्या हाताने मातीला स्पर्ष केला. नंतर तीच माती आपल्या कपाळाला लावली. त्यामुळे अशाप्रकारे ज्या मातीने म्हणजेच ज्या मैदानाने त्याला वर्ल्ड चॅम्पियन बनवलं त्या मातीला स्पर्श करून कृतज्ञता व्यक्त केली होती.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
बारावीत दोनदा नापास, 7 वर्षे ड्रायव्हिंग, शेतकऱ्याच्या लेकानं ठरवलं, झाला फौजदार
सर्व पहा

हीच गोष्ट रोहित शर्माने देखील मागचा टी20 वर्ल्डकप जिंकल्यावर केली होती.रोहितने त्यावेळी वर्ल्डकप जिंकल्यानंतर मातीला स्पर्श करत ती चाखली होती.अशाप्रकारने त्याने मैदाना प्रती कृतज्ञता व्यक्त केली होती.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : 1.32 लाख लोकं बघत होते, पण सूर्या अजिबात लाजला नाही, सर्वांसमोर झुकला आणि...भर मैदानात काय केलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल