TRENDING:

IND vs NZ : घरात लग्नाची धावपळ, तरी सचिन संजूला विसरला नाही, फायनलच्या आधी एक फोन कॉल अन् सर्व काही बदलले

Last Updated:

दरम्यान या विजयानंतर प्रत्येक खेळाडूने आपआपली प्रतिक्रिया दिली होती. त्यात संजू सॅमसनने मोठा खूलासा केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
India vs New Zealand : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर टीम इंडियाने न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करत टी20 वर्ल्ड कप 2026 वर नाव कोरले आहे. टीम इंडियाने तिसऱ्यांदा वर्ल्ड कपवर नाव कोरले आहे. आणि सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकला आहे. आणि यजमान म्हणून वर्ल्डकप जिंकणारा पहिलाच संघ ठरला आहे. दरम्यान भारताच्या या ऐतिहासिक विजयात सगळ्याच खेळाडूच मोलाच योगदान आहे.त्यामुळे या विजयानंतर प्रत्येकानेच आपआपले अनुभव शेअर केले होते. त्यात संजूने एक वेगळीच गोष्ट सांगितली. या गोष्टीची कुणालाच कल्पना नव्हती. ती म्हणजे संजू सॅमसन वर्ल्ड कपमध्ये आऊट ऑफ फॉर्म होता. पण त्याला फॉर्ममध्ये परत आणण्यासाठी क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने मदत केली होती.विशेष म्हणजे सचिन लग्नाच्या गडबडीत असताना देखील त्याने संजूला मदत केली. या संदर्भातलाच अनुभवच संजूने सांगितला आहे.
sachin tendulkar sanju samson
sachin tendulkar sanju samson
advertisement

भारताने हा सामना जिंकून तिसऱ्यांदा वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं. तसेच याआधी कोणत्याही देशाने सलग दोन वर्ल्डकप जिंकले नव्हते.पण भारताने आज ही किमया करून दाखवली आहे. यजमान टीमला आतापर्यंत वर्ल्डकप जिंकता आला नव्हता. पण भारताने ही गोष्ट अहमदाबादच्या मैदानावर करून दाखवली आहे.

दरम्यान या विजयानंतर प्रत्येक खेळाडूने आपआपली प्रतिक्रिया दिली होती. त्यात संजू सॅमसनने मोठा खूलासा केला आहे.खरं तर या वर्ल्ड कपच्या सूरूवातीपासून संजू आऊट ऑफ फॉर्म होता.त्याच्या बॅटीतून धावाच निघत नव्हत्या.त्यामुळे तो प्रचंड निराश होता.ग्रुप स्टेजमध्ये त्याला दोनच सामने खेळायची संधी मिळाली.पण त्याला मोठ्या धावा करता आल्या नाही.त्यामुळे तो निराश झाला होता.

advertisement

पण यानंतर अभिषेक शर्मा देखील फ्लॉप ठरत असल्याने संजूची अचानक एंन्ट्री झाली. या एंन्ट्रीनंतर संजूने जो कमबॅक केला तो बघण्यासारखा होता. कारण त्याने वेस्ट इंडिज विरूद्ध 97 धावांची खेळी केली. त्यानंतर सेमी फायनल सामन्यात त्याने 89 धावांची खेळी केली. आणि आज फायनल सामन्यात त्याने 89 धावांची खेळी केली. संजूच्या याच धावांच्या बळावर टीम इंडिया वर्ल्ड कप विजेती झाली.

advertisement

संजूच्या या संपूर्ण खेळीच श्रेय सचिन तेंडुलकरला जाते. कारण मॅच नंतर बोलताना संजू म्हणाला, गेल्या काही महिन्यांपासून, मी सचिन सरांशी सतत संपर्कात होतो. या दरम्यान मी त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्याशी मोठ्या गप्पा मारल्या. त्यांच्यासारख्या एखाद्याकडून मार्गदर्शन मिळाल्याने माझ्या खेळात सुधार झाला.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
बारावीत दोनदा नापास, 7 वर्षे ड्रायव्हिंग, शेतकऱ्याच्या लेकानं ठरवलं, झाला फौजदार
सर्व पहा

दरम्यान यात सचिन तेंडुलकरला मानलं पाहिजे कारण घरात मुलगा अर्जुन तेंडुलकरची लगीनघाई असताना देखील तो संजूच्या मदतीला धावला आणि त्याने त्याला मोलाच मार्गदर्शन केले आणि त्याच्या खेळात मोठा सूधार झाला.त्यामुळे संजूच्या या कामगिरीचे संपूर्ण श्रेय सचिन तेंडुलकरला जाते.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs NZ : घरात लग्नाची धावपळ, तरी सचिन संजूला विसरला नाही, फायनलच्या आधी एक फोन कॉल अन् सर्व काही बदलले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल