TRENDING:

Suryakumar Yadav : 'प्रयत्न केले, पण काहीच करू शकलो नाही', वर्ल्ड कप जिंकल्यानंतरही सूर्याची खदखद बाहेर!

Last Updated:

टीम इंडियाने कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात 2026 टी-20 वर्ल्ड कपची ट्रॉफी जिंकली. भारताला टी-20 वर्ल्ड कप जिंकवून देणारा सूर्या तिसरा कर्णधार बनला, पण टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतरही सूर्यकुमार यादवच्या मनातली खदखद बाहेर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : टीम इंडियाने कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात 2026 टी-20 वर्ल्ड कपची ट्रॉफी जिंकली. भारताला टी-20 वर्ल्ड कप जिंकवून देणारा सूर्या तिसरा कर्णधार बनला, पण टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतरही सूर्यकुमार यादवच्या मनातली खदखद बाहेर आली आहे. सूर्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही फॉरमॅट खेळण्याबद्दल सूर्या बोलला आहे. मला वनडे क्रिकेट फार आवडलं नाही, पण मी रेड बॉल क्रिकेट 10-12 वर्ष खेळलो. ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्टमध्ये मी फक्त एकच इनिंग खेळू शकलो, असं सूर्यकुमार यादव म्हणाला.
News18
News18
advertisement

'नशिबामध्ये जे असतं तेच तुम्हाला मिळतं. मी रेड बॉल क्रिकेटपासूनच खेळायला सुरूवात केली आणि 10-12 वर्ष रणजी ट्रॉफी खेळली. मुंबईमध्ये खूप रेड बॉल क्रिकेट खेळलो. जर तुम्ही मुंबईमध्ये वाढला असाल तर तुम्हाला रेड बॉलनेच सुरूवात करावी लागते', असं सूर्यकुमार यादव पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाला.

वनडेमध्ये सूर्याची निराशाजनक कामगिरी

'व्हाईट बॉल क्रिकेट खेळायला सुरूवात केली, तेव्हा तो फॉरमॅट आवडायला लागला, मग टी-20 मध्ये रस वाढला. मी वनडे क्रिकेटमध्ये चांगलं करण्याचा प्रयत्न केला, पण खास काही करू शकलो नाही. टी-20 क्रिकेट जसं चाललंय, त्यात मी सेट झालो', असं वक्तव्य सूर्यकुमार यादवने केलं आहे.

advertisement

टेस्टच्या कमबॅकवर सूर्या काय म्हणाला?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
द्राक्षला 12000 रुपये भाव, लिंबू दरही तेजीत, कांद्याची काय स्थिती? Video
सर्व पहा

'टेस्ट क्रिकेटमध्ये कमबॅक झालं तर मला खूप आनंद होईल, कारण 2010 पासून ते 2020 पर्यंत मी रेड बॉल क्रिकेट खेळलं आहे. 10 वर्ष रेड बॉल क्रिकेट खेळणं हा खूप मोठा कालावधी आहे. हा फॉरमॅट माझ्या जवळचा आहे. जर संधी मिळाली तर कुणाला नको असेल?', अशी प्रतिक्रिया सूर्यकुमार यादवने दिली आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Suryakumar Yadav : 'प्रयत्न केले, पण काहीच करू शकलो नाही', वर्ल्ड कप जिंकल्यानंतरही सूर्याची खदखद बाहेर!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल