TRENDING:

T20 World Cup 2026: कोणालाच कळाले नाही खरी मॅच कुठे फिरली, 11व्या ओव्हरच्या 5व्या बॉलवर गेम पलटला; टीम इंडियाच्या विजयाचा हिरो

Last Updated:

IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्यात उस्मान खानची 11व्या ओव्हरमधील विकेटच खरी टर्निंग पॉइंट ठरली. त्या एका चेंडूनंतर पाकिस्तानची गाडी रुळावरून घसरली आणि सामना भारताच्या बाजूने वळला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कोलंबो: T20 वर्ल्ड कप 2026 मधील ग्रुप A च्या लढतीत भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला. सूर्याच्या टीमने 61 धावांनी सामना जिंकून सुपर 8 मध्ये आपली जागा पक्की केली. भारताने प्रथम फलंदाजी करत 176 धावांचे मजबूत टार्गेट सेट केले होते. ज्यामध्ये ईशान किशनचा 77 धावांच्या बायोनिक खेळीचा समावेश होता.
News18
News18
advertisement

भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानी फलंदाजांचा समाचार पहिल्या ओव्हरपासून घेण्यास सुरुवात केली होती. जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्याने पाकिस्तानी आघाडीच्या फलंदाजांना झटपट बाद केले. मात्र सामना पुन्हा पाकिस्तानकडे वळण्याची एक संधी उस्मान खानच्या इनिंगमुळे निर्माण झाली होती.

सामन्यातला टर्निंग पॉइंट

उस्मान खान मैदानावर फार काळ शांत पाहिला नव्हता. तो सेट झाला आणि 34 चेंडूत 44 धावा करीत पाकिस्तानाला टार्गेट “चेस” करुन देण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या खेळीमुळे पाकिस्तानला विजयाची आशा दिसत होती. परंतु 11व्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर त्याची विकेट मिळाली आणि मॅच भारताच्या बाजूने फिरली. त्याला अक्षर पटेलने बाद केले. उस्मान बाद झाला तेव्हा पाकिस्तानी अवस्था 5 बाद 73 होती. तो बाद झाल्यानंतर पाकचा डाव कोसळला.

advertisement

भारताने ही मॅच 61 धावांनी जिंकली आणि सुपर 8 मधील स्थान निश्चित केले. आता टीम इंडियाची अखेरची ग्रुप फेरीतील लढत नेदरलँडविरुद्ध 18 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

T20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचे सर्वात मोठे पराभव (धावांच्या फरकाने)

84 धावा विरुद्ध वेस्ट इंडिज, मीरपूर 2014

61 धावा विरुद्ध भारत, कोलंबो RPS 2026*

48 धावा विरुद्ध इंग्लंड, द ओव्हल 2009

advertisement

T20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानची सर्वात कमी धावसंख्या

82 विरुद्ध वेस्ट इंडिज, मीरपूर 2014

113/7 विरुद्ध भारत, न्यूयॉर्क 2024

114 विरुद्ध भारत, कोलंबो RPS 2026*

123/7 विरुद्ध श्रीलंका, कोलंबो RPS 2012

T20 वर्ल्ड कपमध्ये एका संघाविरुद्ध सर्वाधिक विजय

8* भारत विरुद्ध पाकिस्तान (एक सुपर ओव्हर विजय समाविष्ट)

6 ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश

advertisement

6 पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश

6 श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आल्याच्या दरात मोठी उलथापालथ, डाळींब आणि केळीला काय मिळाला आज भाव? Video
सर्व पहा

6 वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup 2026: कोणालाच कळाले नाही खरी मॅच कुठे फिरली, 11व्या ओव्हरच्या 5व्या बॉलवर गेम पलटला; टीम इंडियाच्या विजयाचा हिरो
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल