रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवण्याचा प्रस्ताव
विराट कोहली सध्या बंगळुरूमध्ये असून त्याने या मॅचसाठी सराव देखील सुरू केला होता. विशेष म्हणजे, ही मॅच प्रेक्षकांशिवाय म्हणजेच रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवण्याचा प्रस्ताव होता, तरीही समितीने त्याला मान्यता दिली नाही. भारतीय संघाच्या आगामी नियोजनाच्या पार्श्वभूमीवर, कोहलीचा हा सराव महत्त्वाचा मानला जात होता, पण आता ही मॅच होणार नसल्याचे स्पष्ट झालं आहे.
advertisement
विशेष परवानगी मागितली होती पण...
स्टेडियममधील व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी पोलीस आयुक्त आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. जीबीए आयुक्त महेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत स्टेडियममधील सद्यस्थिती मॅचसाठी योग्य नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. केएससीएने (KSCA) ही मॅच आयोजित करण्यासाठी विशेष परवानगी मागितली होती, परंतु सुरक्षेच्या कारणास्तव ती नाकारण्यात आली.
चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू
या निर्णयाला जून महिन्यातील एका दुर्दैवी घटनेची पार्श्वभूमी आहे. आयपीएल विजयाच्या जल्लोषात चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर सरकारने स्टेडियमवर मोठे कार्यक्रम घेण्यास निर्बंध घातले आहेत. तेव्हापासून या ऐतिहासिक मैदानावर एकही स्पर्धात्मक मॅच झालेली नाही.
विजय हजारे ट्रॉफीच्या वेळापत्रकात मोठा बद
दरम्यान, केएससीएचे अध्यक्ष व्यंकटेश प्रसाद यांनी सरकार आणि गृहविभागाची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, मात्र समितीने सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत आपला निर्णय कायम ठेवला. या निर्णयामुळे विजय हजारे ट्रॉफीच्या वेळापत्रकात मोठा बदल झाला आहे.
