TRENDING:

Virat Kohli : भुवनेश्वर कुमारच्या घातक यॉर्करसमोर कोहली मैदानात कोसळला, नेटसमधला 14 सेकंदाचा धडकी भरवणारा VIDEO

Last Updated:

विराट कोहलीच्या सरावाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीसमोर विराट कोहली अक्षरश कोसळला आहे.या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Virat Kohli Face Bhuvaneshwar Kumar in Nets :आयपीएल 2026 च्या हंगामाला येत्या 28 मार्चपासून सूरूवात होणार आहे.या हंगामातला पहिला सामना हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रंगणार आहे.त्यामुळे रॉयल चँलेंजर्स पहिल्याच सामन्यात विजयाची छाप पाडण्यासाठी कसून सराव करते. या दरम्यान विराट कोहलीच्या सरावाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीसमोर विराट कोहली अक्षरश कोसळला आहे.या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहेय
virat kohli
virat kohli
advertisement

खरं तर विराट कोहली आयपीएल 2026 च्या हंगामासाठी लंडनहून भारतात दाखल झाला आहे.कोहलीने भारतासाठी कसोटी आणि टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.त्यामुळे फॅन्सला त्याला फक्त टीम इंडियासाठी वनडे फॉरमॅट आणि आयपीएलमध्ये खेळताना पाहतील.दरम्यान याच आयपीएलसाठी आता तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या कॅम्पमध्ये पोहोचला आहे.यावेळी नेटसमध्ये सराव करत असताना भुवनेश्वर कुमारच्या एका घातक यॉर्करचा फटका बसल्याने कोहली क्रीजवर तोल गमावून बसला होता. कोहलीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

advertisement

advertisement

भुवीने कोहलीला घातक यॉर्कर टाकला वास्तविक, विराट कोहली सध्या आरसीबीच्या खेळाडूंसोबत सराव करत आहे. तो नेटमध्ये फलंदाजी करत असताना भुवनेश्वर कुमारचा एक घातक यॉर्कर त्याच्या पायाजवळ पडला, ज्याचा तो नीट अंदाज घेऊ शकला नाही. यामुळे त्याचे दोन्ही पाय घसरले आणि तोल गेला. कोहलीच्या फलंदाजीचा आणि भुवीच्या अप्रतिम यॉर्करचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

advertisement

आयपीएलमधली कामगिरी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गुढीपाडव्याचा थरारक सोहळा, 73 फूट उंचीच्या खांबावर चढून काढले जुने कापड, अमरावतीमधील परंपरा काय?
सर्व पहा

विराट कोहलीबद्दल बोलायचे झाल्यास, तो 37 वर्षांचा आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये 267 सामने खेळून 8661 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. मात्र, गेल्या हंगामात त्याच्या संघाने 18वर्षांत प्रथमच आयपीएलचे विजेतेपद पटकावले. आता, आरसीबी विजेतेपद राखण्याचा प्रयत्न करेल आणि पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा कोहलीवर असतील.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Virat Kohli : भुवनेश्वर कुमारच्या घातक यॉर्करसमोर कोहली मैदानात कोसळला, नेटसमधला 14 सेकंदाचा धडकी भरवणारा VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल