Virat Kohli Century : विजय हजारे ट्रॉफी 2025-26 स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात कर्णधार रिषभ पंतच्या दिल्ली संघाने आंध्र प्रदेशचा 4 विकेट राखून पराभव केला आहे. दिल्लीच्या या विजयात विराट कोहलीने मोलाची भूमिका बजावली आहे. कारण विराट कोहलीने नेहमीप्रमाणे 'चेस मास्टर'ची भूमिका बजावत दिल्लीला एक हाती विजय मिळवून दिला आहे. त्यामुळे दिल्लीची या स्पर्धेत विजयाने सुरूवात झाली आहे.
advertisement
खरं तर आंध्रप्रदेशने प्रथम फलंदाजी करताना 8 विकेट गमावून 298 धावा केल्या होत्या. त्यामुळे आंध्रप्रदेशने दिलेल्या या 298 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीची सूरूवात खराब झाली होती. दिल्लीकडून प्रियांश आर्या आणि अर्पित राणा सलामीला उतरले होते.यावेळी अर्पित राणा अवघ्या 2 धावांवर बाद झाला होता. त्यानंतर विराट कोहलीची मैदानात एंन्ट्री झाली होती.
विराट कोहली आणि प्रियांश आर्याने यावेळी दिल्लीचा डाव सावरत 113 धावांची पार्टनरशिप केली होती.त्यानंतर प्रियांश आर्या 74 धावा करून बाद झाला.त्यानंतर नितीश राणाची मैदानात एंन्ट्री झाली होती. या दरम्यान विराट कोहलीने एका बाजूने तुफान फटकेबाजी सूरू केली. या दरम्यान त्याने 101 बॉलमध्ये 131 धावांची वादळी खेळी केली होती.या खेळीत दरम्यान त्याने 3 षटकार आणि 14 चौकार लगावले आहे. त्यामुळे विराट कोहलीने नेहमीप्रमाणे चेसमास्टरची भूमिका निभावत संघाला विजयाच्या दिशेने आणून ठेवलं होतं.
विशेष म्हणजे दिल्लीला विजयाच्या उंबरठ्यावर आणण्यात नितीश राणानेही मोलाची भूमिका बजावली. नितीश राणाने 55 बॉलमध्ये 77 धावांची खेळी केली होती. या दोन्ही खेळाडूंच्या बळावर दिल्ली 289 धावापर्यंत पोहोचली होती. यानंतर दिल्लीला विजयासाठी अवघ्या 10 धावांची आवश्यकता होती. या दरम्यान दिल्लीने 2 विकेट गमावले आणि शेवटी हर्ष त्यागी आणि नवदीप सैनीने मॅच जिंकवली.
दिल्लीने 6 विकेट गमावून 300 धावा केल्या. विशेष म्हणजे दिल्लीने हे लक्ष्य 37. 4 ओव्हर म्हणजेच 226 बॉलमध्ये पुर्ण करत सामना जिंकला होता. या विजयात कोहलीचा मोठा वाटा होता.
आंध्र प्रदेशने प्रथम फलंदाजी करताना 50 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 298 धावा ठोकल्या होत्या. यावेळी रिकी भूईने 122 धावांची शतकीय खेळी केली होती. या व्यतिरीक्त कोणत्याही खेळाडूला मोठ्या धावा करता आल्या नव्हत्या.
