खरं तर रोहित शर्मा आणि विराट कोहली शेवटच्या क्षणी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळताना दिसले होते. त्यानंतर दोन्हीही खेळाडू आयपीएलमध्ये देखील झळकले होते. तेव्हापासून हे दोन्हीही खेळाडू मैदानापासून दूर आहेत.आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यात हे खेळाडू मैदानात उतरतील अशी चर्चा होती. पण त्याआधीच हे खेळाडू आता मैदानात धावा काढताना दिसणार आहेत.
हिंदूस्थान टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, रोहित शर्मा आणि विराट कोहली भारत अ संघातून ऑस्ट्रेलिया अ विरूद्ध खेळताना दिसणार आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी हे सराव सामने खेळवण्यात येणार आहेत.
advertisement
हे सामने 30 सप्टेंबर ते 5 ऑक्टोंबर दरम्यान खेळवले जाणार आहे.या सामन्यात रोहित शर्मा आण विराट कोहली खेळण्याची शक्यता आहे.
श्रेयसच्या नेतृत्वात खेळणार
येत्या काही दिवसात ऑस्ट्रेलिया अ संघ मल्टी डे सामन्याच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआकडून भारताच्या अ संघांची घोषणा करण्यात आली आहे. या संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी श्रेयस अय्यरच्या खांद्यावर दिली आहे. तर उप कर्णधारपदाची जबाबदारी श्रेयस अय्यरकडे सोपवली गेली आहे.
भारताला ऑस्ट्रेलिया विरूद्ध दोन मल्टी डे सामने खेळायचं आहेत.या दोन्ही सामन्याचे श्रेयस अय्यर करणार आहे. या सामन्यांना 16 सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. या सामन्यासाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.यासह दुसऱ्या सामन्यात श्रेयस अय्यरसोबत केएल राहुल आणि मोहम्मद सिराज देखील खेळणार आहेत.
भारत-अ संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिमन्यू ईश्वरन, नारायण जगदीसन (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, ध्रुव जुरेल (उप-कर्णधार/यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, हर्ष दुबे, आयुष बडोनी, कृष्णा बडोनी, तनिश कुमार रेड्डी, नितिश कुमार, कृष्णा रेड्डी. ब्रार, खलील अहमद, मानव सुथार, यश ठाकूर.
ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध भारत-अ वेळापत्रक
पहिला 4 दिवसांचा सामना: 16 ते 19 सप्टेंबर, लखनऊ
दुसरा 4 दिवसांचा सामना: 23 ते 26 सप्टेंबर, लखनऊ
पहिला एकदिवसीय सामना: 30 सप्टेंबर, कानपूर
दुसरा एकदिवसीय सामना: 3 ऑक्टोबर, कानपूर
तिसरा एकदिवसीय सामना: 5 ऑक्टोबर, कानपूर
श्रेयस अय्यर अलिकडच्या काळात भारतीय संघासाठी फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळताना दिसला आहे. श्रेयसने फेब्रुवारी 2024 मध्ये इंग्लंडविरुद्ध भारतीय संघासाठी शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्याच वेळी, त्याचा शेवटचा टी20 आंतरराष्ट्रीय सामना डिसेंबर 2023 मध्ये बेंगळुरू येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध होता.