2026 च्या वर्षात विराट कोहली आणि रोहित शर्मा टीम इंडियाकडून सगळ्यात आधी न्यूझीलंडविरुद्धची वनडे सीरिज खेळतील. 11 जानेवारीपासून या सीरिजला सुरूवात होणार आहे. या वर्षभरात विराट आणि रोहित हे भारताकडून फक्त 18 सामने खेळणार आहेत. चाहत्यांना 365 दिवसांमध्ये फक्त 18 दिवस विराट-रोहितला भारताकडून खेळताना पाहता येणार आहे.
2026 मध्ये टीम इंडिया न्यूझीलंड, अफगाणिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्ध वनडे सीरिज खेळणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाच्या दोन वनडे सीरिज होणार आहेत. प्रत्येक सीरिजमध्ये टीम इंडिया 3-3 वनडे खेळणार आहे.
advertisement
2026 मध्ये टीम इंडियाच्या वनडे
भारत विरुद्ध न्यूझीलंड (11, 14 आणि 18 जानेवारी)
भारत विरुद्ध अफगाणिस्तान- जून 2026
भारत विरुद्ध इंग्लंड (14, 16, 19 जुलै)
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज- सप्टेंबर, ऑक्टोबर 2026
भारत विरुद्ध न्यूझीलंड- नोव्हेंबर 2026
भारत विरुद्ध श्रीलंका- डिसेंबर 2026
भारत-न्यूझीलंड सीरिज कधी?
भारत आणि न्यूझीलंड याच्यातल्या वनडे सीरिजला 11 जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. यानंतर दुसरी वनडे 14 आणि तिसरी 18 जानेवारीला होईल. या सीरिजसाठी टीम इंडियाची निवड 3 जानेवारीला होणार आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहली हे सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. विराटने दक्षिण आफ्रिका आणि मग विजय हजारे ट्रॉफीमध्ये शतकं ठोकली आहेत. तर दुसरीकडे रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये 2 अर्धशतकं आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईसाठी शतक ठोकलं.
