पहिल्याच मॅचमध्ये 260 धावांची दमदार खेळी
भारतासाठी कधीही न खेळलेल्या महान क्रिकेटपटूंमध्ये अमोल मुजुमदार यांचे नाव आदराने घेतलं जातं. मुंबईकडून रणजी ट्रॉफीतील आपल्या पहिल्याच मॅचमध्ये त्यांनी 260 धावांची दमदार खेळी करून आपल्या आगमनाची जोरदार घोषणा केली होती. हा फक्त एक स्टार्ट होता. त्यानंतर त्यांनी डोमेस्टिक क्रिकेटमध्ये तब्बल 11,000 हून अधिक धावांचा डोंगर उभा केला आणि या स्तरावर अक्षरशः बॉस म्हणून ओळखले गेले. पण दुर्देवाने त्यांना कधी टीम इंडियामध्ये जागा मिळाली नाही.
advertisement
फर्स्ट क्लास क्रिकेटमधून निवृत्ती
दुर्देवाने, अमोल मुजुमदार यांचा काळ असा होता की, टीम इंडियाच्या मिडल ऑर्डरमध्ये सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्ही व्ही एस लक्ष्मण आणि सौरव गांगुली यांसारख्या दिग्गजांचं स्थान पक्कं होतं. अशा खेळाडूंमुळे त्यांना कधी टीम इंडियाचे दरवाजे उघडे झाले नाहीत. दिग्गज खेळाडूंमुळे त्यांना कधीही टीम इंडियाची कॅप घालता आली नाही. 2014 मध्ये, 21 वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीनंतर त्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, पण एक सल मनात कायम राहिली.
भारतीय महिला क्रिकेट टीमचे प्रशिक्षक
अमोल मुजुमदार यांच्या निवृत्तीनंतर रोहित शर्माने देखील ट्विट करत मुजुमदार यांच्यासाठी ट्विट करत आदर व्यक्त केला होता. निवृत्तीनंतर 11 वर्षांनी पुन्हा देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा अमोल मुजुमदार यांच्या मनात आली. अमोल मुजुमदार यांनी भारतीय महिला क्रिकेट टीमचे प्रशिक्षक म्हणून पुन्हा एकदा मैदान गाजवले. ज्या टीमसाठी ते खेळाडू म्हणून खेळू शकले नाहीत, त्याच टीमचे मार्गदर्शन करत त्यांनी ODI वर्ल्ड कप उंचावला.
'चक दे इंडिया' मधील टीम इंडियाचे कबीर खान
दरम्यान, मुजुमदार यांचा वुमेन्स टीमसोबतचा हा प्रवास एका खेळाडूची जिद्द, कधीही हार न मानण्याची वृत्ती आणि स्वप्नपूर्तीची कहाणी आहे. एखाद्या चित्रपटाच्या पटकथेप्रमाणे त्यांचे आयुष्य पूर्ण वर्तुळातून फिरले. वर्ल्ड कप फायनलचा मुजुमदार यांच्यासाठी विजय तर खास होताच, पण बॉलीवूडचा किंग आणि 'चक दे इंडिया' मधील 'कबीर खान' ची भूमिका साकारणाऱ्या शाहरुख खान यांच्या 60 व्या वाढदिवशी हा क्षण साकारणे म्हणजे सोने पे सुहागा! असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
