वर्ल्ड कप फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव का झाला? याचं अचूक विश्लेषण या क्रिकेट फॅनने केलं आहे. या विश्लेषणावरून त्याला क्रिकेटचं नॉलेज बऱ्यापैकी असल्याचं दिसत आहे. एक मिनिटाच्या या व्हिडिओमध्ये या चाहत्याने भारतीय टीमने काय काय चुका केल्या, ऑस्ट्रेलियन टीमची रणनिती कशी यशस्वी ठरली? ते स्पष्ट शब्दांमध्ये सांगितलं आहे. स्टेडियममध्ये असलेल्या एक लाखांपेक्षा जास्त लोकांना शांत केल्याबद्दल त्याने ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सलाही सलाम केला आहे.
advertisement
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर कमेंट्सनीही धुडगूस घातला आहे. काहींनी तर या माणसाला टीम इंडियाचा पुढचा कोच बनवा, अशी मागणीही केली. याचं विश्लेषण योग्य आहे, फॉर्म आणि आकडे बघता भारतीय टीम ऑस्ट्रेलिया पेक्षा चांगली होती, पण रणनिती वापरून ऑस्ट्रेलियाने चांगलं प्लानिंग केलं आणि भारतीय बॅटिंगला शांत ठेवलं, अशी कमेंटही एकाने केली आहे. खेळाडूंना शिव्या देणाऱ्यांऐवजी अशाप्रकारच्या समंजस चाहत्यांची गरज असल्याचंही एकाने म्हटलं आहे.
वर्ल्ड कप 2023 च्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत सहाव्यांदा वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. कमिन्सच्या या निर्णयावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं, पण त्याचा हा निर्णय नंतर योग्य ठरला. ऑस्ट्रेलियन बॉलरनी भारताला फक्त 240 रनवर रोखलं.
या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा ओपनर ट्रॅव्हिस हेडने 137 रनची खणखणीत खेळी केली. तसंच हेडने ऑस्ट्रेलियाच्या बॉलिंगवेळी रोहित शर्माचा उत्कृष्ट कॅच पकडला, तेव्हापासून ऑस्ट्रेलियाने मॅचमध्ये कमबॅक केलं. भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला सुरूवातीलाच तीन धक्के लागले पण हेडने लाबुशेनच्या साथीने किल्ला लढवला, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाचा फायनलमध्ये 6 विकेटने विजय झाला. विराट कोहलीला प्लेअर ऑफ द सीरिज दैऊन गौरवण्यात आलं.