खरं तर मुंबईकडून तिसरी ओव्हर टाकायला शबमन ईस्माईल आली होती. यावेळी शबनम ईस्माईलच्या दुसऱ्याच बॉलवर बेथ मुनीने बॉल मारला होता. हा बॉल मुंबईच्या संजीवन संजनापासून खूप दूर होता. पण संजीवन संजनाने मैदानात डाईव्ह मारून खतरनाक कॅच घेतला होता. हा कॅच पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चूकला होता.
दरम्यान संजनाच्या या कॅचमुळे बेथ मुनी अवघ्या 8 धावांवर बाद झाली होती. सोफी डिवाईन 25 आणि अनुष्का शर्माने 33 धावा करून गुजरातचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला होता. यासोबत अॅशले गार्डनरने 28 बॉलमध्ये 46 धावांची खेळी केली होती. या खेळीच्या बळावर गुजरात संघाने प्रथम फलंदाजी करताना 167 धावा केल्या आहेत. त्यामुळे आता मुंबईला सामना जिंकण्यासाठी 168 धावांची आवश्यकता आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 30, 2026 9:01 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : मानलं पोरीला! मुंबईच्या खेळाडूने घेतला खतरनाक कॅच, VIDEO पाहून अंगावर काटा येईल
