गुजरात जाएटसने दिल्ली कॅपिटल्ससमोर 168 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची सूरूवात चांगली झाली होती. दिल्लीकडून लीझेले ली आणि शेफाली वर्मा सलामीला उतरले होते. यावेळी लिझेले लीने 43 धावांची खेळी केली.शेफाली वर्मा 31 धावा करून बाद झाली. या दोन्ही खेळाडू बाद झाल्यानंतर कर्णधार जेमीमा रॉड्रीग्ज आणि लॉरा वोल्व्हार्ट मैदानात आली होती.यावेळी जेमीमाने 41 आणि लॉराने 28 धावांची खेळी करून संघाला सामना जिंकून दिला.अशाप्रकारे दिल्ली कॅपिटल्सने गुजरात जाएसच्या 7 विकेटने पराभव केला आहे. गुजरात जाएटसकडून जॉर्जिया वेरहामने 2 विकेट तर राजश्री गायकवाडने एक विकेट काढली होती.
advertisement
गुजरातच्या फलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्या डावाची सूरूवात चांगली झाली नव्हती. कारण बेथ मुनी आणि सोफी डिवाईन फलंदाजीला उतरली होती. यावेळी सोफी डिवाईन 6 तिच्यानंतर अनुष्का शर्मा 16, अॅशले गार्डनर शुन्यावर आणि कनिका अहूजा 6 धावांवर बाद झाली होती.एकाबाजून हे विकेट पडत असताना बेथ मुनीने गुजरातचा डाव सावरला होता. त्यानंतर जॉर्जिया वेरहाने 35 धावांची खेळी केली आणि काश्वी गौतमने 18 धावा आणि बेथ मुनी 62 धावा करून नाबाद राहिली, या बळावर गुजरात जाएटनसने 168 धावा केल्या होत्या.
दिल्ली कॅपिटल्सने हा आव्हान 7 विकेट राखून पूर्ण करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे.दिल्ली कॅपिटल्सने चौथ्यांदा फानललमध्ये प्रवेश केला आहे. पण त्यांना एकदाही फायनल जिंकता आली नाही आहे.आता जेमीमा रॉड्रीग्जच्या नेतृत्वात तरी दिल्ली संघ फायनल जिंकतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
