या सामन्यात मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, त्यानंतर यूपी वॉरियर्सने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 187 रन केले. मेग लेनिंगने 45 बॉलमध्ये 70 रनची आक्रमक खेळी केली. तर लिचफिल्डने 37 बॉलमध्ये 61, हरलीन देओलने 25 आणि च्लोइ ट्रायनने 21 रन केले. मुंबईकडून नॅट स्कीव्हर ब्रंटला 2, अमेलिया केरला 3 विकेट मिळाल्या. तर निकोला कॅरे, हेली मॅथ्यूज आणि अमनजोत कौरला एक-एक विकेट घेण्यात यश आलं.
advertisement
पॉईंट्स टेबलची स्थिती
मुंबई इंडियन्सचा यंदाच्या मोसमातला यूपी वॉरियर्सविरुद्धचा हा सलग दुसरा पराभव आहे. तसंच या मोसमात मुंबईने 5 सामन्यांमध्ये फक्त 2 विजय मिळवले आहेत. पॉईंट्स टेबलमध्ये मुंबई 4 पॉईंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर गुजरात जाएंट्स आणि यूपी वॉरियर्सही प्रत्येकी 4-4 पॉईंट्ससह तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. दिल्ली कॅपिटल्सने एकच सामना जिंकल्यामुळे ते शेवटच्या म्हणजेच पाचव्या क्रमांकावर आहेत. मुंबई आणि यूपीने आतापर्यंत 5 सामने खेळले आहेत, तर गुजरातने 4 आणि दिल्लीने 3 सामने खेळले आहेत. 3 सामन्यांमध्ये 3 विजय मिळवलेली आरसीबी पॉईंट्स टेबलमध्ये 6 पॉईंट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे.
मुंबई इंडियन्सच्या मोसमातल्या आणखी 3 मॅच शिल्लक आहेत, त्यामुळे प्ले-ऑफला पोहोचण्यासाठी मुंबईला उरलेल्या 3 सामन्यांपैकी कमीत कमी 2 सामने तरी जिंकावे लागणार आहेत. मुंबईचा नेट रनरेट हा इतर टीमपेक्षा चांगला असल्यामुळे मुंबईला कमीत कमी 2 विजय गरजेचे आहेत.
