फायनलपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता - जेमिमा
जेमिमाने आपल्या खेळाडूंच्या जिद्दीचे आणि स्वभावाचे भरभरून कौतुक केले असून फायनलपर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोपा नव्हता, असे नमूद केले. खेळाडूंसोबतच रात्रंदिवस मेहनत घेणारा सपोर्ट स्टाफ, लॉजिस्टिक टीम आणि प्रत्येक व्यक्तीचे तिने आभार मानले आहेत. विशेषतः जगभरातील आणि स्टेडियममधील फॅन्सनी ज्या प्रकारे ओरडून टीमला पाठिंबा दिला, त्याबद्दल तिने कृतज्ञता व्यक्त केली आहे.
advertisement
बॅटर्सने चांगली कामगिरी केली पण...
संपूर्ण सीझनचा आढावा घेताना जेमिमा म्हणाली की, टूर्नामेंटची सुरुवात चांगली झाली तर सोपं जातं, मात्र कठीण प्रसंगातून स्वतःला सावरून इथपर्यंत येणं महत्त्वाचं होतं. निकी आणि राणा यांनी केलेल्या फलंदाजीचा उल्लेख करत तिने भारतीय क्रिकेटमधील बॅटिंग डेप्थ जगाला दिसून आली असल्याचे सांगितले. प्रत्येक खेळाडूने या मॅचमध्ये आपली पूर्ण शक्ती पणाला लावली होती. आमच्या बॅटर्सने चांगली कामगिरी केली पण बॉलर्सने अधिक चांगली कामगिरी अपेक्षित होती, असं म्हणत जेमिमाने दिल्लीच्या बॉलर्सवर पराभवाचं खापर फोडलं. मरिझन्ने काप, श्रीचरणी आणि मिनू मानी या बॉलर्सवर जेमिमा नाराज होती, असं दिसून येतंय.
जेमिमाकडून नंदनी आणि मिन्नू यांचं विशेष कौतुक
दरम्यान, युवा खेळाडूंच्या कामगिरीवर बोलताना जेमिमाने नंदनी आणि मिन्नू यांचे विशेष कौतुक केले. नंदनीने तिला दिलेल्या भूमिकेपेक्षा अधिक सरस कामगिरी केली, तर मिन्नूने फील्डिंगमध्ये दिलेले योगदान आणि तिचा वावर हे टीमसाठी मोलाचे ठरले. या संपूर्ण प्रवासात यंगस्टर्सना मिळालेला अनुभव आणि त्यांची शिकण्याची वृत्ती ही सकारात्मक गोष्ट असल्याचे तिनं स्पष्ट केलं आहे.
