भारत विरुद्ध बांग्लादेश ऑक्टोबर महिन्यात तीन मॅचच्या सीरिजला सुरुवात होणार आहे. टी 20 सीरिजसाठी 28 सप्टेंबर रोजी टीम इंडियाच्या खेळाडूंची नावं जाहीर करण्यात आली. यामध्ये काही सीनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. टीम इंडियाचं नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे देण्यात आलं आहे. रोहितच्या लाडक्या खेळाडूला संधी न देता बाकावर बसवण्यामागे नेमकं कारण मात्र समजू शकलं नाही.
advertisement
बांग्लादेश विरुद्धच्या सीरिजमध्ये स्पिनर वरुण चक्रवर्तीला खेळण्याची संधी मिळाली आहे. 33 वर्षीय वरुणने भारतासाठी शेवटचा सामना 2021 मध्ये खेळला होता. त्यानंतर तब्बल अडीच वर्षांनी पुन्हा एकदा टीम इंडियातून टी 20 सामना खेळण्याची संधी मिळाली आहे. तर चहलला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
चहल 2024 मध्ये टी 20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा एक भाग होता. मात्र त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याला बाकावर बसवण्यात आलं. आता पुन्हा एकदा त्याला टीम इंडियामध्ये खेळण्याची संधी न दिल्याने चाहते नाराज झाले आहेत.
युझवेंद्र चहल चांगल्या फॉर्ममध्ये आहे. चहलने इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये आपली योग्यता सिद्ध केली आहे. त्याने नॉर्थम्प्टनशायरसाठी सलग दोन सामन्यांमध्ये 9-9 विकेट्स घेतल्या. चहलने आयपीएलच्या मागील दोन हंगामातही उत्कृष्ट कामगिरी केली होती. चहलने आयपीएल 2024 मध्ये 15 सामन्यांत 30.33 च्या सरासरीने 18 विकेट घेतल्या. IPL 2023 मध्ये या फिरकीपटूने 20.57 च्या सरासरीने 21 विकेट घेतल्या होत्या. चहलने आ. चहलने 160 आयपीएल सामन्यात 22.44 च्या सरासरीने 205 विकेट घेतल्या आहेत. चहलनंतर पीयूष चावलाने आयपीएलमध्ये 183 विकेट्स घेतल्या आहेत.
भारत विरुद्ध बांग्लादेश सामना
पहिला टी 20 सामना - ग्वालियर
दुसरा टी 20 सामना - दिल्ली
तीसरा टी 20 सामना - हैदराबाद
टीम इंडिया - सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंह, हार्दिक पंड्या, रियान पराग, नीतीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा (विकेटकीपर), अर्शदीप सिंह, हर्षित राणा, मयंक यादव.