झिम्बाब्वेचा माजी फास्ट बॉलर हेन्री ओलोंगा क्रिकेटमधून निवृत्त झाला, त्यानंतर आता तो गाण्यात आपले नशीब आजमावतो आहे. ओलोंगा क्रूझवर, लहान गावांमध्ये, शाळकरी मुलांसाठी आणि लहान बारमध्ये गातो. गेल्या 10 वर्षांत त्याचे जीवन नाट्यमयरित्या बदलले आहे. ओलोंगाला नेहमीच संगीताची आवड होती. त्याचे "अवर झिम्बाब्वे" हे गाणे 24 वर्षांपूर्वी राजकीय हिंसाचाराच्या काळात रिलीज झाले होते, जेव्हा रॉबर्ट मुगाबे यांचे सरकार जमीन आणि शेतजमीन ताब्यात घेत होते.
advertisement
हेन्री ओलोंगा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2008 मध्ये न्यूझीलंडमध्ये झालेल्या टी20 स्पर्धेत खेळला होता. तेव्हापासून, त्याने विविध प्रकारची कामे केली आहेत. 'जरी मी दूरच्या प्रदेसात गेलो तरी माझा आत्मा या घरासाठी तळमळत राहील. वेळ आणि जागा आपल्याला वेगळं करू शकतात, पण घर कायमच हृदयात राहिल. आपण सगळे मिळून देश बनवतो. झिम्बाब्वे आपला देश आहे, ही जमीन आपली आहे. त्या गाण्यातले काही शब्द सध्या मी कुठे आहे, याचं वर्णन करतात. मी ते गाणं ऐकलं की थोडं अस्वस्थ होतं', असं ओलोंगा द टेलिग्राफला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाला होता.
ओलोंगाला जीवे मारण्याच्या धमक्या
गाणे रिलीज झाल्यानंतर दोन वर्षांनी, हेन्री ओलांगा आणि माजी क्रिकेटपटू अँडी फ्लॉवर यांनी 2003 च्या वर्ल्ड कप सामन्यादरम्यान देशातील 'लोकशाहीच्या हत्ये'चा निषेध करण्यासाठी हातावर काळ्या पट्ट्या बांधल्या होत्या. त्यानंतर ओलोंगाला जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या. त्याला टीम बसमधून काढण्यात आलं, त्यानंतर त्याला झिम्बाब्वेमधून पळून जाण्यास भाग पाडण्यात आले. झिम्बाब्वेमधून बाहेर काढल्यानंतर ओलोंगा ऑस्ट्रेलियात स्थायिक झाला.
'झिम्बाब्वेच्या लोकांसोबत एकत्र काम करण्याचं आवाहन आम्ही केलं होतं. मी शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत होतो, पण अनेकांना उलट वाटलं. तुम्ही माझ्या गाण्यांमधील बोल पाहिले तर मी लोकांना चांगल्यासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न केला होता', अशी प्रतिक्रिया हेन्री ओलोंगाने दिली आहे.
मी लोकांकडे बोट दाखवलं नाही
'मी फक्त लोकांकडे बोट दाखवत नाहीये, आणि काळ्या पट्ट्यांचा निषेध याचबद्दल होता. आपण एक देश म्हणून चांगले होऊ शकतो, आपण राजकारणी म्हणून चांगले होऊ शकतो, आपण नागरिक म्हणून चांगले होऊ शकतो', असं ओलोंगा म्हणाला. एका स्प्रिंगबोर्डने माझ्या अपेक्षा वाढवल्या होत्या, मी रेकॉर्ड बनवणार होतो, पण सगळं काही संपलं, कोव्हिड-19 मुळे तो रियलिटी शो रद्द झाला, असं ओलोंगाने सांगितलं. हेन्री ओलोंगा क्रुझवरही गाणी म्हणतो.
हेन्री ओलोंगा हा झिम्बाब्वेचा पहिला कृष्णवर्णीय टेस्ट क्रिकेटर आणि सगळ्यात तरुण क्रिकेटरही होता. त्याने वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी पदार्पण केले. ओलोंगा 27 वर्षांचा होता तेव्हा त्याने हाताला काळी पट्टी बांधली होती, हा निषेध संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये सुरू राहिला. 'माझ्यावर भित्रा असल्याचा आरोप करण्यात आला. मी झिम्बाब्वेमध्येच राहायला हवे होते. उच्चायुक्तांनी मला बाजूला घेतले. ते म्हणाले तू झिम्बाब्वे सरकारची बदनामी का करत आहेस?' मी आदर दाखवण्याचा प्रयत्न केला. मी माफी मागितली, पण त्यांना वाटले की मी देशाचा विश्वासघात केला. झिम्बाब्वेमधील संपूर्ण क्रिकेट आणि राजकीय वातावरण माझ्यासाठी खूप अस्वस्थ करणारे होते कारण लोकांना वाटले की मी समस्या निर्माण करणारा आहे', असं ओलोंगा म्हणाला.
ओलोंगाने दिला सचिनला त्रास
1998 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये हेन्री ओलंगाने सचिन तेंडुलकरला त्रास दिला होता. ओलोंगाने सचिनला बाउन्सर टाकून आऊट केले. ओलोंगाने सचिनचा बळी त्याच्याच शैलीत साजरा केला. आऊट झाल्यानंतर सचिन खूपच निराश झाला होता, पुढच्या सामन्यापर्यंत सचिनला नीट झोपही लागली नव्हती.
