खरं तर भारताने याच मैदानावर पाकिस्तानला 175 धावांचे लक्ष्य दिले होते. पण या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान 114 धावांवर ऑल आऊट झाली होती.त्यामुळे भारताने 61 धावांनी हा सामना जिंकला होता.त्यामुळेच पाकिस्तानला जे जे जमलं नाही आहे ते आता झिम्बाबेने करून दाखवलं आहे. त्यामुळे आता झिम्बाबेच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे. तसेच या विजयासह आता झिम्बाबे ग्रुप बी मध्ये टेबल टॉपला गेली आहे. झिम्बाबेने ग्रुप स्टेजमध्ये एकही मॅच हारली नाही आहे. त्यामुळे चार सामन्यापैकी 3 सामने त्यांनी जिंकले आहेत आणि एक सामना पावसामुळे रद्द झाला होता.
advertisement
श्रीलंकेने दिलेल्या 179 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाबेची सूरूवात चांगली झाली होती. झिम्बाबेकडून ब्रायन बेनेट आणि ताडीवानाशे मरुमानी सलामीली उतरले होते. या दोघांनी डावाला चांगली सूरूवात करून दिली होती. दोन्ही खेळाडूंनी पॉवरप्लेमध्ये 55 धावांची खेळी केली होती. यानंतर 69 धावांची पार्टनरशीप केल्यानंतर मरूमानी 34 वर बाद झाला होता.
मरूमानी बाद झाल्यानंतर रायन बर्ल मैदानात आला होता. पण तो देखील 23 धावांवर बाद झाला होता.त्यानंतर सिकंदर रझा मैदानात आला होता. त्यानंतर ब्रायन बेनेटने ताबडतोड खेळी करून झिम्बाबेला विजयाच्या नजीक आणले होते.ब्रायन बेनेटने सर्वाधिक 60 धावांची खेळी केली होती. त्याच्यासोबत सिंकदर रझाने 26 बॉलमध्ये 45 धावांची खेळी केली होती. या खेळीच्या बळावरच झिम्बाबने हा उलटफेर करून दाखवला आहे.
श्रीलंकेच्या प्रथम फलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर पथूम निसांकाने 62 धावांची सर्वाधिक खेळी केली होती. त्याच्यासोबत पवन रथनायकाने 44 धावांची खेळी केली होती.या खेळीच्या बळावर श्रीलंकेने 179 धावा केल्या होत्या. झिम्बाबेकडून ब्लेसिंग मुजरबानी, ब्रॅड इव्हान आणि ग्रीम क्रिमरने प्रत्येकी 2 विकेट काढली आहे. तर रायन बर्लने 1 विकेट काढली होती.
