सुबोध कन्नौज जिल्ह्यातील जसोदा गावाचा रहिवासी आहे. पदवी घेतल्यानंतर त्याने अनेक ठिकाणी नोकरीसाठी प्रयत्न केले, पण त्याला फक्त 8 ते 10 हजार रुपये महिन्याची नोकरी मिळत होती. इतक्या कमी पैशात घर चालवणं खूप कठीण होतं. त्यानंतर सुबोधने डिझेल इंजिन आणि लाईट फिटिंगसारखं छोटं काम सुरू केलं, पण त्यातही त्याला जास्त कमाई झाली नाही.
advertisement
योजनेचा कसा झाला फायदा?
दरम्यान, सुबोधला जिल्हा फलोत्पादन विभागाच्या पीएमएफएमई योजनेबद्दल माहिती मिळाली. या योजनेअंतर्गत त्याने 5 लाख 25 हजार रुपयांचे कर्ज घेतले, ज्यामध्ये त्याला 35% अनुदान मिळाले. या पैशातून त्याने सौर ऊर्जा पॅनेल लावले आणि पिठाची चक्कीचा व्यवसाय सुरू केला. यासाठी त्याने सौर ऊर्जा पॅनेल बसवल्यामुळे त्याची विजेची बचत झाली आणि उत्पन्नही खूप वाढले. आज सुबोध खर्च वजा करून दररोज 1000 रुपयांपेक्षा जास्त कमावतो. आता त्याचा भाचाही त्याच्यासोबत काम करतो, त्यामुळे त्यालाही रोजगार मिळाला आहे.
काय म्हणतो सुबोध?
लोकल 18 शी बोलताना सुबोध म्हणाला, "मला कधीच वाटलं नव्हतं की, मी स्वतःचा व्यवसाय करू शकेन. मी नोकरीच्या शोधात फिरत होतो, पण या योजनेने माझं आयुष्य बदलून टाकलं. आता मी चक्की चालवतो आणि रोज चांगले पैसे कमावतो. माझा भाचाही माझ्यासोबत काम करतो. मी तरुणांनाही विनंती करतो की, त्यांनी सरकारी योजनांचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करावा."
हे ही वाचा : कूलरमध्ये पाणी भरायचा कंटाळा येतोय? 100 रुपयांचा हा 'जुगाड' लावा अन् ऑटोमॅटिक भरत राहील पाणी
हे ही वाचा : महिलेची कमाल! घरात बसून उभ केलं लाखोंचं साम्राज्य, व्यवसाय ऐकून तुम्हीही सुरू कराल 'हा' बिझनेस