Amazon वर आता त्याची किंमत ₹26,998 आहे. म्हणजेच तुम्हाला ₹8,001 ची थेट सूट मिळत आहे. शिवाय, जर तुम्ही SBI किंवा Axis Bank क्रेडिट कार्डने पैसे दिले तर तुम्हाला ₹2,250 ची अतिरिक्त सूट मिळेल. ज्यामुळे फोनची किंमत ₹24,748 पर्यंत कमी होईल.
ChatGPT वापरणाऱ्यांनो सावधान! दिसताय आत्महत्येसारखे लक्षणं, रिपोर्टमध्ये खुलासा
खरेदीदार ते दरमहा ₹1,309 पासून सुरू होणाऱ्या EMI वर देखील खरेदी करू शकतात. तुमच्या डिव्हाइसच्या स्थितीनुसार तुम्ही तुमचा जुना फोन ₹25,648 पर्यंतची एक्सचेंज व्हॅल्यूही मिळवू शकता.
advertisement
Redmi Note 14 Pro+ मध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 3,000 निट्स पीक ब्राइटनेससह एक जबरदस्त 6.67-इंच 1.5K OLED डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले केवळ चमकदार नाही तर उत्कृष्ट रंग अचूकता आणि गुळगुळीत स्क्रोलिंग देखील देतो. फोन Qualcomm Snapdragon 7s Gen 3 प्रोसेसरने सुसज्ज आहे. जो कामगिरीच्या बाबतीत तो जलद आणि कार्यक्षम बनवतो. यासह, तुम्हाला 12GB RAM आणि 512GB पर्यंत इंटरनल स्टोरेजचा ऑप्शन मिळतो, ज्यामुळे मल्टीटास्किंग आणि मोठ्या फाइल्स स्टोअर करणे अत्यंत सोपे होते.
मेगापिक्सेल म्हणजे काय? चांगला फोटो घेण्यासाठी हे गरजेचं? डिटेल्स वाचा
दमदार कॅमेरा आणि बॅटरी
कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर, फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 50MPचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 50MPचा टेलिफोटो सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी, यात 20MPचा फ्रंट कॅमेरा आहे, जो स्पष्ट आणि डिटेल्ड फोटो कॅप्चर करतो.
Redmi Note 14 Pro+ बॅटरीच्या बाबतीतही खूप शक्तिशाली आहे. यात 90W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मोठी 6,200mAh बॅटरी आहे, म्हणजेच फोन काही मिनिटांतच पूर्णपणे चार्ज होतो.
फोनची टिकाऊपणा वाढवण्यासाठी, त्यात IP66, IP68 आणि IP69 रेटिंग आहेत. ज्यामुळे तो पाणी आणि धूळ प्रतिरोधक बनतो. तसेच, स्क्रीनचे संरक्षण करण्यासाठी Corning Gorilla Glass Victus 2 वापरण्यात आला आहे. जो स्क्रॅच आणि धक्क्यांपासून त्याचे संरक्षण करतो.
