MacBook वर किती सूट आहे?
13-इंचाचा MacBook Air M4 हा Apple च्या ऑफिशियल वेबसाइटवर ₹10,000 च्या इंस्टंट डिस्काउंटनंतर ₹89,900 मध्ये उपलब्ध आहे. ही ऑफर ICICI, Axis आणि American Express कार्डवर लागू आहे. त्याचप्रमाणे, 14 आणि 16 इंचाच्या मॅकबुक प्रो मॉडेल्सवर ₹10,000 चं इंस्टंट डिस्काउंट मिळू शकते. डिस्काउंटनंतर, त्यांच्या किमती आता अनुक्रमे ₹1,59,900 आणि ₹2,39,900 आहेत.
advertisement
हे आहेत WhatsApp हॅक होण्याचे संकेत! दिसल्यावर लगेच व्हा अलर्ट, करा हे काम
आयफोन 17 सिरीजवर किती सूट आहे?
आयफोन 17 सिरीज मॅकबुकपेक्षा कमी कॅशबॅक देते. आयफोन 17 फक्त ₹1,000 कॅशबॅक देत आहे. या आयफोनला जास्त मागणी आहे आणि सध्या बहुतेक प्लॅटफॉर्मवर स्टॉक संपला आहे. स्टॉकमध्ये सुधारणा झाल्यानंतर जास्त कॅशबॅकची अपेक्षा केली जाऊ शकते. प्रो मॉडेल्स निवडक कार्ड्स वापरून ₹5,000 कॅशबॅकसह उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे, आयफोन 16 आणि 16 प्लस मॉडेल्सना दर कपातीव्यतिरिक्त ₹4,000 पर्यंत कॅशबॅक मिळतेय.
Mobile Interesting Facts : मोबाईलमध्ये 5G दाखवतं पण स्पीड 4G सारखाच का असतो?
या प्रोडक्ट्सवर देखील मिळताय फायदे
मॅकबुक आणि आयफोन व्यतिरिक्त, इतर कंपनीच्या प्रोडक्ट्सवर देखील कॅशबॅक मिळू शकतो. कंपनी वॉच सिरीज 11 वर 4,000 रुपये, अॅपल वॉच SE 3 वर 2,000 रुपये आणि एअरपॉड्स प्रो 3 आणि प्रो 4 वर 1,000 रुपये कॅशबॅक देत आहे. अॅपल वॉचच्या खरेदीवरील कॅशबॅक व्यतिरिक्त, अॅपल अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करताना तीन महिन्यांसाठी अॅपल म्युझिकचे फ्री सबस्क्रिप्शन आणि तीन महिन्यांसाठी अॅपल टीव्हीचे फ्री सबस्क्रिप्शन देखील देत आहे.
