Mobile Interesting Facts : मोबाईलमध्ये 5G दाखवतं पण स्पीड 4G सारखाच का असतो?
- Published by:Priya Lad
Last Updated:
4G Speed On 5G Network Mobile Internet : मोबाईलमध्ये 5G दिसणं म्हणजे तुम्हाला प्रचंड स्पीड मिळेलच, याची खात्री नसते. नेटवर्कचा प्रकार, टॉवरचं अंतर, फोनची क्षमता, प्लॅनची मर्यादा आणि आसपासचा वापर हे सगळे घटक मिळूनच तुम्हाला खरा 5G अनुभव देतात.
सध्या बहुतेक स्मार्टफोन्समध्ये नेटवर्कवर 5G चिन्ह दिसायला लागलं आहे. पण आश्चर्य म्हणजे इतक्या मोठ्या अनेकांना प्रत्यक्ष वापरात 4G पेक्षा फारसा फरक जाणवत नाही. व्हिडिओ स्ट्रिमिंग, फाइल डाऊनलोडिंग, सोशल मीडिया ब्राऊझिंग सगळं काही जवळपास जुन्या स्पीडवरच चालू असल्याचं अनेक वेळा जाणवतं. मग प्रश्न असा पडतो की, मोबाईलमध्ये 5G दाखवतं तरी स्पीड 4G सारखाच का येतो? यामागे तांत्रिक, नेटवर्क आणि उपकरणांशी संबंधित अशी अनेक कारणं आहेत.
advertisement
advertisement
5G चे तीन फ्रिक्वेन्सी बँड्स असतात. लो बँड, मिड बँड आणि एमएम वेव्ह. लो बँड (700 MHz) लांब रेंज पण स्पीड थोडा जास्त, मीड बँड 3.5 GHz चांगला स्पीड पण अतिवेग नाही, एमएम वेव्ह (26 GHz) 1–3 Gbps पर्यंत स्पीड पण रेंज खूपच कमी. भारतात मीड बँड सर्वाधिक वापरलं जातं. mmWave फारच मर्यादित ठिकाणी आहे. म्हणून अनेकदा आपण वापरत असलेला Sub-6 GHz 5G (mid-band) हा जास्त वेगवान 4G इतकाच जाणवतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


