MacBook Air M3 किंमत
MacBook Air M3 मॉडेल आता फक्त 1,03,390 रुपयांना विजय सेल्सवर उपलब्ध आहे. ही किंमत 16GB RAM + 256GB SSD व्हेरिएंटसाठी आहे. ज्यामध्ये 13.6-इंचाचा डिस्प्ले आहे. हे मॉडेल कंपनीने 1,14,900 रुपयांमध्ये लॉन्च केले होते, म्हणजेच तुम्हाला या लॅपटॉपवर 11,510 रुपयांचं डिस्काउंट मिळू शकतं. याशिवाय, SBI आणि ICICI बँक क्रेडिट कार्डवर 10,000 रुपयांची अतिरिक्त सूट आहे, जी किंमत 93,390 रुपयांपर्यंत खाली आणते.
advertisement
झटपट वाढेल इंटरनेटची स्पीड! राउटर सेटिंग्सला असं करा ऑप्टिमाइज
MacBook Air M2 ची किंमत
सेलमध्ये, 13.6 इंच डिस्प्ले असलेल्या MacBook Air M2 मॉडेल ज्यामध्ये 8GB RAM + 512GB SSD उपलब्ध आहे त्याची किंमत 95,500 रुपये आणि 16GB RAM + 256GB SSD व्हेरिएंटची किंमत 89,890 रुपये झाली आहे. विजय सेल्स या मॉडेल्सवर 10,000 रुपयांची अतिरिक्त सूट देखील देत आहे. ज्यामुळे डील आणखी शानदार झाली आहे. Windows Laptopच्या किमतीत तुम्ही हा लॅपटॉप खरेदी करु शकता.
MacBook Air M1 किंमत
कमी बजेट असलेल्या खरेदीदारांसाठी, जुने M1 मॉडेल देखील कमी किमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. तसंच, चांगल्या परफॉर्मेंससाठी, M2 व्हर्जन निवडण्याचा सल्ला दिला जातो. कारण M1 थोडा जुना झाला आहे. 8GB RAM + 256GB SSD सह MacBook Air M1 फक्त 68,890 रुपयांमध्ये विजय सेल्सवर उपलब्ध आहे. तसंच, हा लॅपटॉप अजूनही पॉवरफूल विंडोज लॅपटॉपशी स्पर्धा करू शकतो.
WhatsApp आणतेय नवं फीचर! मदत मागणं होईल सोपं, पाहा कसा होईल फायदा
Macbook Pro वर डिस्काउंट
तुम्ही MacBook Pro विकत घेण्याचा विचार करत असाल, तर 16GB RAM आणि 512GB SSD सह 14-इंच मॉडेलची किंमत 1,52,900 रुपये आहे. जी 1,69,900 रुपयांच्या लॉन्च किंमतीपेक्षा कमी आहे. ज्यामुळे तुम्हाला 17,000 रुपयांची सूट मिळेल. ICICI आणि SBI बँक कार्डवर 5,000 रुपयांची एक्स्ट्रा सूट उपलब्ध आहे. ज्यामुळे त्याची किंमत 1,47,900 रुपयांपर्यंत खाली आली आहे.
Macbook Pro With M4 Pro Chip
M4 Pro चिप सह येणारा MacBook Pro 1,79,900 रुपयांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. भारतात 1,99,900 रुपयांना लाँच केलेले हे मॉडेल अधिकृत अॅपल स्टोअरवर लिस्टेड आहे आणि सध्या 20,000 रुपयांच्या मोठ्या डिस्काउंटसह विजय सेल्सवर खरेदीसाठी उपलब्ध आहे.
