advertisement

WhatsApp आणतेय नवं फीचर! मदत मागणं होईल सोपं, पाहा कसा होईल फायदा

Last Updated:

WhatsApp आपल्या वेब यूझर्ससाठी एक नवीन फीचर आणत आहे. त्याच्या मदतीने ते कंपनीच्या सपोर्ट टीमची मदत घेऊ शकतील. गरज भासल्यास ते कंपनीच्या प्रतिनिधीशीही बोलू शकतील.

whatsapp
whatsapp
मुंबई : व्हॉट्सॲप आपल्या यूजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असते. आता कंपनी आपल्या वेब यूझर्ससाठी "Chat with Us" फीचर आणतेय. यामुळे यूजर्सना व्हॉट्सॲपच्या सपोर्ट टीमची मदत घेणे सोपे होणार आहे. आत्तापर्यंत, यूझर्सना मदत मिळवण्यासाठी वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नां (FAQs) च्या लांबलचक यादीतून जावे लागत होते. यासाठी बराच वेळ गेला आणि अनेक वेळा प्रश्नाचे योग्य उत्तर सापडले नाही.
नवीन फीचर कसे काम करेल?
या नवीन फीचरमुळे युजर्सचा बराच वेळ वाचणार आहे. जर त्यांना कंपनीच्या सपोर्ट टीमकडून मदत हवी असेल, तर FAQ पाहण्याची गरज भासणार नाही आणि ते थेट मदत विभागात जाऊन कंपनीच्या सपोर्ट टीमशी संपर्क साधू शकतील. यूझर्सच्या प्रश्नांची उत्तरे AI-जनरेटेड मेसेज किंवा ऑटोमेटेड रिस्पॉन्ससह सुरू होऊ शकतात. जर यूझर्स यावर समाधानी नसेल तर तो कंपनीच्या प्रतिनिधीशी बोलण्याची विनंती करू शकतो.
advertisement
वेब व्हर्जनवर फीचर येईल
हे फीचर फक्त वेब व्हर्जनवर येईल. म्हणजे लॅपटॉप, टॅबलेट, क्रोमबुक इत्यादींवर व्हॉट्सॲप चालवताना हे फीचर वापरता येईल. कंपनी वेब यूझर्ससाठी अनेक नवीन फीचर्सवर काम करत आहे. असे एक फीचर म्हणजे रिव्हर्स इमेज सर्च, जे लवकरच सर्व यूझर्ससाठी आणले जाईल.
advertisement
रिव्हर्स इमेज सर्च फीचर कसे काम करेल?
इंटरनेटवर खोटी माहिती भरपूर प्रमाणात असताना, हे फीचर यूझर्सना बनावट माहितीपासून वाचवण्यात मदत करेल. व्हॉट्सॲपच्या वेब व्हर्जनवर येणाऱ्या या फीचरमध्ये इमेजच्या वर दिसणाऱ्या 3 डॉट्समध्ये वेबवर सर्च करण्याचा ऑप्शन उपलब्ध असेल. यावर क्लिक करून यूजर्स गुगलवर कोणतीही इमेज शोधू शकतील. गुगलवर उपलब्ध असल्यास, मूळ वेबसाइटला भेट देऊन त्याचे संपूर्ण संदर्भ मिळू शकतात.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
WhatsApp आणतेय नवं फीचर! मदत मागणं होईल सोपं, पाहा कसा होईल फायदा
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement